ठळक मुद्देएनएचआय सूत्रानुसार वाहनांच्या श्रेणीनुसार टोलच्या दरात जवळपास १५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीदरम्यान आता टोल टॅक्सही वाढणार आहे. नॅशनल हायवे ॲथाॅरिटी ऑफ इंडिया (एनएचआय)ने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा टोल वाढविण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. सध्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही; परंतु डिझेल, पेट्रोलच्या सातत्याने वाढत असलेल्या किमतीनंतर आता टोलही वाढणार असल्याने वाहन चालक चिंतित आहेत.