प्रवीण खापरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीच्या काळात बांधकाम साहित्यांच्या किमती प्रचंड वधारल्या आहेत. त्यामुळे, अनेक बांधकामे अर्ध्यावरच रखडले आहेत. अशा स्थितीत भारतीय प्राचीन विज्ञानशास्त्राच्या भात्यातून उदयास आलेल्या वैदिक प्लास्टरचा बांधकामासाठी स्वस्त पर्याय म्हणून उपलब्ध झाला आहे. या शुद्ध देशी बांधकामाच्या शैलीचा उपयोग शहराच्या अनेक ठिकाणी केला जात आहे.
सर्वसामान्यत: घराचे बांधकाम करताना विटा, रेती, गिट्टी, सिमेंट आणि लोहा यांचा वापर होतो. आजच्या घडीला विटा, रेती, सिमेंट व गिट्टी यांचे दर दुपटीवर पोहोचले आहेत. त्यातही घर बांधल्यावर त्यावर सिमेंटचे प्लास्टर चढवणे, पुट्टी चढवून त्यावर रंगरंगोटी करणे या प्रक्रिया असतात. या सगळ्यांचा विचार केल्यास आजच्या घडीला एक दहा बाय दहाची खोली बांधतो म्हटले की मजूरांचा खर्च धरता साधारणत: सव्वा ते दीड लाख रुपये किंवा त्याहूनही अधिक खर्च येतो. शिवाय मोठ्या प्रमाणात पाणी आणि वेळही लागतो. मात्र, प्राचीन भारतीय तंत्राने विकसित करण्यात आलेल्या वैदिक प्लास्टरचा खर्च बराच कमी आणि पाणी व वेळेची बचत करणारा पर्याय ठरत आहे.
वैदिक विटा आणि प्लास्टर आणि लोहा यातून हा खर्च अर्ध्यावर यायला लागला आहे. शिवाय, केवळ प्लास्टर भिजविण्यासाठी लागणारे पाणी वगळता पाण्याचा अपव्ययही टाळता येत आहे. त्यामुळे, खोली तयार झाली की लागलीच तेथे वहिवाट करण्यास सुरुवात करता येत आहे. शिवाय या प्लास्टरमध्ये आयुर्वेदिक घटक असल्याने अशा खोलीमध्ये किंवा घरामध्ये वावरणाऱ्या कुटूंबीयांचे आरोग्यवर्धनही होत असल्याचा दावा याचे निर्माते करत आहेत. देशी गाईचे शेण, जिप्सम, गावरानी गोंद, चिकन माती, निंबाचा रस किंवा भुकटी याच्या मिश्रणातून हे प्लास्टर व विटा तयार होत असल्याने घराच्या तापमानातही २० अंश डिग्री पर्यंतचे तापमान कमी होते. जमिनीवर वैदिक टाईल्स लावल्याने सामान्य टाईल्समुळे वाताचे आणि अंगदुखीचे होणारे त्रासही नष्ट होत असल्याचा दावा यातून केला जात आहे.किमतीमध्ये बरीच तफावतआजच्या घडीला कोणत्याही कंपनीची लाल वीट ५ ते ७ रुपये आणि अॅश वीट ४ ते ६ रुपये दराने उपलब्ध होत आहे. त्यातुलनेत वैदिक वीट ३.५० ते ४ रुपये प्रति वीट दराने उपलब्ध होते. शिवाय सिमेंटची एक बॅग ३५० रुपये (५० किलो) दराने तर वैदिक प्लास्टरची बॅग ३२५ रुपये (२५ किलो) दराने उपलब्ध होते. सिमेंटचा वापर करताना रेतीचा उपयोग अनिवार्य आहे आणि रेती आजच्या घडीला ३२ हजार रुपये डोजर आहे. वैदिक प्लास्टरमध्ये रेतीची गरजच नसते. यावरून बांधकामच्या किमतीत बरीच तफावत दिसून येते.फायदे दिसले की लोक विचार करायला लागतात - परिक्षित बोपर्डीकरसध्या सगळ्यांपुढे परंपरागत बांधकाम शैलीच असल्याने, वैदिक बांधकाम पद्धतीवरचा विश्वास बसायला वेळ लागेल. मात्र, ज्यांनी प्रयोग म्हणून याचा विचार केला त्यांना त्याचे फायदेही जाणवायला लागले आहेत. नागपुरात महाल, नंदनवन येथे वैदिक बांधकामासाठी काही लोकांनी पुढाकार घेतला आणि त्यांचे बघून इतरही घेत आहेत. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील काही खोल्यांचे काम याचेच आहे तर विहिरगाव येथे तयार होत असलेल्या सर्वात मोठ्या गोरक्षण मध्ये वैदिक प्लास्टरच्या माध्यमातूनच बांधकाम सुरू असल्याचे बांधकाम कंत्राटदार परिक्षित बोपर्डीकर यांनी लोकमतला सांगितले.