शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

घरबसल्या पाहू शकता रेशन दुकानातील व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:45 AM

रेशनमधील धान्यात होणारा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर रोखण्यात यश आले आहे. नागपूर शहराने राबवलेला हा पायलट प्रोजेक्ट सध्या संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे, हे विशेष.

ठळक मुद्देरेशन धान्याच्या काळाबाजारावर आळा नागपूरचा यशस्वी प्रयोग राज्यभरात लागू

आनंद डेकाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेशन दुकान आणि धान्यातील गैरप्रकारावर बरीच आरडाओरड होते. गरिबांना मिळणारे धान्य खऱ्या गरीबांपर्यंत पोहोचत नव्हते ही वस्तुस्थिती होती. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यासाठी शासन व प्रशासनाने घेतलेल्या पुढाकारामुळे रेशन दुकानात झालेल्या एकूण धान्याची विक्री व बचत याबाबतचा संपूर्ण व्यवहार आता आपल्यालाही घरबसल्या पाहता येणे शक्य झाले आहे.परिणामी रेशनमधील धान्यात होणारा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर रोखण्यात यश आले आहे.  नागपूर शहराने राबवलेला हा पायलट प्रोजेक्ट सध्या संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे, हे विशेष.सार्वजनिक वितरण व्यवस्थेत असलेल्या त्रुटी दूर व्हाव्यात या उद्देशाने राज्य शासनाने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी एईपीडीएस आणि आधार लिंक करण्यास सुरुवात केली. नागपूरने यात बाजी मारली. नागूर शहरात ९९.९५ टक्के रेशनकार्ड आधारने जोडण्यात आले. सरकारने नागपूर शहर पायलट प्रोजेक्ट राबवण्याचा निर्णय घेतला.२०१७ मध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान हा प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात आला. आधार आधारित सार्वजनिक वितरण व्यवस्था असे याला नाव देण्यात आले. यात नागूर शहरातील रेशन कार्डचे डिजिटायझेशन करण्यात आले. प्रत्येक रेशन कार्डला आरसीआयडी (रेशन कार्ड आयडेंटीफिकेशन नंबर) देण्यात आले.यासोबतच शहरातील सर्व ६६५ रेशन दुकानांना पॉस मशीन (पॉर्इंट आॅफ सेल) मशीन उपलब्ध करून देण्यात आले. या मशीनद्वारे धान्य विक्रीचे व्यवहार होऊ लगले. एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रत्येक व्यवहार अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून पाहता येणे शक्य झाले.या पद्धतीत रेशन दुकानातील मालक-चालक हाच पॉस मशीन सुरू करू शकतो. कारण त्यात त्याचा अंगठ्याचे ठसे आवश्यक असतात. तसेच धान्य वितरण झाल्यावर त्याच्या ठशाद्वारेच पावती निघत असते. ते सॉफ्टवेअरने अटॅच असल्याने रेशन दुकानातील प्रत्येक अधिकारी कार्यालयात डॅश बोर्डवर पाहू शकतात. आता मोबाईल अ‍ॅपही सुरु झाल्याने प्रत्येक व्यवहार घरबसल्या पाहता येतात. नागपूरने यशस्वी करून दाखवलेला हा प्रयोग सध्या राज्यभरात लागू करण्यात आला आहे. या प्रयोगसाठी अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी नागपुरातील अन्न पुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा नुकताच सत्कारही केला आहे.

धान्य वाहतूक करणाऱ्या ट्रकवर जीपीएसनागपूर शहरात एकूण ६ झोन असून ६६५ रेशन दुकान आहेत. या दुकानांमध्ये गोदामातून थेट धान्य पोहोचवण्यासाठी ४४ ट्रक आहेत. प्रत्येक ट्रकवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसेच प्रत्येक ट्रकला हिरवा रंग दिला असून सुधारित वितरण व्यवस्था असे लेबलही लावले आहेत. मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून या प्रत्येक ट्रकचे लोकेशन, त्यात असलेले धान्य, कोणत्या रेशन दुकानात जात आहे. त्याची संपूर्ण माहिती बसल्याजागी पाहता येते. कधी ट्रक निघाला, आता कुठे हे. किती वाजता धान्य उतरवले याची माहिती मिळते. त्यामुळे धान्याचा काळाबाजार करणे शक्य नाही.

७ महिन्यात १५ हजार मेट्रिक टन धान्याची बचतआधार आधारित वितरण सार्वजनिक वितरण व्यवस्थेमुळे रेशनच्या वितरण प्रणालीत कमालिची सुधारणा झालेली आहे. आधी कोटा दर महिन्याला ठरलेला होता. तो किती गेला किती शिल्लक राहिला याचा पत्ताच नव्हता. सध्या किती धान्य पोहोचले. किती उचलल्या गेले, याची माहिती मिळते. अनेकजण दुसºया महिन्याला धान्य उचलत नाहीत. त्यामुळे ते धान्य वाचते. गेल्या सात महिन्यात अशा प्रकारे १५ हजार मेट्रिक टन धान्याची बचत झाली आहे. यासाठी अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट आणि तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी घेतलेले परिश्रम महत्त्वाचे आहे.-पी. एस. काळे, जिल्हा अन्नधान्य पुरवठा अधिकारी.