शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

संख्या ५० हजार अन् रजिस्ट्री २७२ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:24 AM

शासन निर्णयानुसार नागपूर शहरातील ५० हजार झोपडपट्टीधारांना पट्टे वाटप केले जाणार आहे. यासोबतच मालकी हक्काच्या पट्ट्यांची रजिस्ट्री करून दिली जाणार आहे. परंतु १० डिसेंबरपर्यंत जेमतेम २७२ झोपडपट्टीधारकांना मालकी पट्ट्याची रजिस्ट्री करून देण्यात आली आहे. झोपडपट्टीधारकांची संख्या विचारात घेता रजिस्ट्री करून देण्याची प्रक्रिया संथ असल्याने रजिस्ट्रीसाठी लोकांना प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देनागपुरात पट्टे वाटपाची गती संथ : ५० हजार रजिस्ट्रीसाठी किती दिवस लागणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासन निर्णयानुसार नागपूर शहरातील ५० हजार झोपडपट्टीधारांना पट्टे वाटप केले जाणार आहे. यासोबतच मालकी हक्काच्या पट्ट्यांची रजिस्ट्री करून दिली जाणार आहे. परंतु १० डिसेंबरपर्यंत जेमतेम २७२ झोपडपट्टीधारकांना मालकी पट्ट्याची रजिस्ट्री करून देण्यात आली आहे. झोपडपट्टीधारकांची संख्या विचारात घेता रजिस्ट्री करून देण्याची प्रक्रिया संथ असल्याने रजिस्ट्रीसाठी लोकांना प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.अधिकृत झोपडपट्टीतील पात्र रहिवाशांना त्यांच्या घराच्या जमिनीचे मालकी पट्टे देण्याची महत्त्वाकांक्षी योजना नागपूर शहरात राबविली जात आहे. या योजनेतून पट्टे वाटपासोबतच रजिस्ट्री करून दिली जात आहे. मात्र झालेल्या रजिस्ट्रीची संख्या अत्यल्प आहे. शहरातील ९६८ झोपडपट्टीवासीयांना मालकीपट्ट्यासाठी नासुप्रतर्फे मागणीपत्र(डिमांड) पाठविण्यात आल्या आहेत तर २७२ झोपडपट्टीवासीयांची रजिस्ट्री करून देण्यात आली आहे.पूर्व नागपुरातील डिप्टी सिग्नल, आदर्शनगर, प्रजापतीनगर, हिवरी नगर, पँथरनगर, नेहरू नगर, उत्तर नागपुरातील इंदिरानगर, कस्तुरबानगर आदी झोपडपट्टी वसाहतीत रजिस्ट्री प्रक्रिया सुरू आहे. सोनबानगर, आनंदनगर, गोंडपुरा, धम्मदीपनगर, संजय गांधीनगर यासह अन्य भागातील झोपडपट्टीधारकांना नासुप्रने डिमांड पाठविलेल्या आहेत.शहरातील नासुप्रच्या जागेवरील बहुसंख्य झोपडपट्ट्यांचे मालकी हक्क पट्टे वाटपासाठी यापूर्वीच सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात दक्षिण -पश्चिममधील जाट तरोडी, इंदिरानगर, लक्ष्मीनगर, कैकाडीनगर, पवार टोली, पश्चिममधील सेवानगर, पांढराबोडी, अंबाझरी, सुदामपुरी, दक्षिण मधील संजय गांधीनगर, सेवादलनगर, सककरदरा, बिडीपेठ, अम्माकी झोपडपट्टी, पूर्वमधील डिप्टी सिग्नल, पँथरनगर, आदर्शनगर, नेहरूनगर, प्रजापतीनगर, सोनबानगर, साखरकरवाडी, नंदनवन, शांतीनगर, संघर्ष नगर, उत्तर नागपुरातील कस्तुरबानगर, इंदिरानगर, धम्मदीपनगर, संतोष नगर, आनंदनगर, लष्करीबाग आदी वस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. उर्वरित वस्त्यात सर्वेक्षण व्हायचे आहे.उद्दिष्ट कसे पूर्ण होणार?नासुप्रच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. महापालिका व शासकीय जागेवरील झोपडपट्ट्यात ही प्रक्रिया संथ आहे. शहरातील सर्व अधिकृत झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे व रजिस्ट्री करून द्यावी, अशी मागणी शहर विकास मंचचे संयोजक अनिल वासनिक, डॉ. दिलीप तांबटकर, रामलाल सोमकुंवर, राजकुमार वंजारी, रामदास उईके, शैलेंद्र वासनिक, विमल बुलबुले, प्रभा अहेरराव आदींनी केली आहे. पट्टे वाटपाची अशीच संथ गती असल्यास उद्दिष्ट कसे पूर्ण होणार असा सवाल शहर विकास मंचने केला आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcivic issueनागरी समस्या