नागपूर : अनलॉक आणि राखी पौर्णिमेमुळे एसटी बसच्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. राखी पौर्णिमेला बहुतांश नागरिक गावी जातात. त्यामुळे राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकावर गर्दी होत आहे. अनलॉकनंतर एसटीच्या गणेशपेठ आगारातील ६५ बस रस्त्यावर धावत होत्या; परंतु राखी पौर्णिमेमुळे सध्या ८० बसच्या माध्यमातून प्रवाशांची वाहतूक करण्यात येत असून २५ टक्के प्रवासी वाढले आहेत. आगामी दोन दिवसात पुन्हा प्रवाशांची संख्या वाढणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या सुरु असलेल्या विशेष रेल्वेगाड्या
अ) ०२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ विशेष रेल्वेगाडी
ब) ०२१३६ नागपूर-पुणे विशेष रेल्वेगाडी
क) ०२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम विशेष रेल्वेगाडी
ड) ०२२९० नागपूर-मुंबई दुरांतो विशेष रेल्वेगाडी
इ) ०१०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र विशेष रेल्वेगाडी
या मार्गावर वाढल्या फेऱ्या
१)नागपूर-पुणे
२) नागपूर-अमरावती
३) नागपूर-भंडारा
४) नागपूर-रामटेक
५)नागपूर-यवतमाळ
६) नागपूर-चंद्रपूर
७) नागपूर-वरुड
प्रवाशांची गर्दी वाढली
राखी पौर्णिमेमुळे गणेशपेठ बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. अनलॉकनंतर गणेशपेठ बसस्थानकावरून जवळपास ६ हजार प्रवासी प्रवास करीत होते; परंतु राखी पौर्णिमा जवळ आल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली असून सध्या १० हजार प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. आगामी काळात आणखी एसटीच्या प्रवाशांची संख्या वाढणार असल्याची अपेक्षाही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राखी पौर्णिमेसाठी ज्यादा बस सोडणार
‘राखी पौर्णिमेला प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे लांब पल्ल्याच्या तसेच आंतरजिल्हा ज्यादा बस सोडण्याचे नियोजन आहे. प्रवाशांनी मागणी केल्यास ज्यादा बस सोडण्याची तयारी करण्यात आली आहे.’
-अनिल आमनेरकर, आगार व्यवस्थापक, गणेशपेठ आगार
...........