लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढली आहे. बुधवारी ४८८१ नव्यांची तपासणी करण्यात आली. यात ३९१ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर ७ जणांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत १,३६,९९८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर ४२१० जणांचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहरातील ३५१, ग्रामीणमधील ३८ आणि जिल्ह्याबाहेरचे २ जण आहेत. मृतांमध्ये शहरातील ३, ग्रामीणमधील २ आणि जिल्ह्याबाहेरचे दाेन आहेत. आज २५८ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत १,२९, ५२० रुग्ण बरे झाले. रिकव्हरीरेट ९४.५४ टक्के इतका राहिला. आज ४८८१ नमुने तपासण्यात आले. यात शहरातील ४१८३ आणि ग्रामीणमधील ६९८ नमुन्यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ४ हजार ५२२ नमुने तपासण्यात आले आहेत.
ॲक्टिव- ३२६८
बरे झालेले -१,२९५२०
मृत ४२१०