लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या विदर्भातही वाढत आहे. आज मंगळवारी अकोला जिल्ह्यातील एक तर अमरावती जिल्ह्यातील तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले. या रुग्णांसह अमरावतीत रुग्णाची संख्या चार तर विदर्भात रुग्णांची संख्या ३६ झाली आहे. तपासण्यात आलेल्या विदर्भातील १२८ नमुन्यांमधून १२४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत आज पहिल्या टप्प्यात ४६ तर दुसऱ्या टप्प्यात ३१ अशा एकूण ७७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. मेयोच्या प्रयोगशाळेत ५१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. एकूण विदर्भातील १२८ नमुने तपासले असता चार नमुने पॉझिटिव्ह तर १२४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. यात अकोला जिल्ह्यातील एक ६० वर्षीय पुरुष रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. या जिल्ह्यातील हा पहिला रुग्ण आहे. अमरावती जिल्ह्यात ४९ वर्षीय पुरुष, ३८ वर्षीय पुरुष व ४५ वर्षीय महिला रुग्ण पॉझिटिव्ह आली आहे. विदर्भात सध्याच्या स्थितीत नागपुरात १८ रुग्ण एक मृत्यू, बुलडाण्यात १० रुग्ण एक मृत्यू, गोंदिया एक रुग्ण, चंद्रपूरमध्ये एक, वाशिममध्ये एक मृत्यू, अरावतीमध्ये चार रुग्ण, एक मृत्यू व अकोल्यात एक रुग्ण असे एकूण ३६ रुग्ण व चार मृत्यूची नोंद आहे.-विदर्भातील कोरोनाची स्थिती
जिल्हा रुग्ण मृत्यू
नागपूर १८ १
बुलडाणा १० १
गोंदिया १ ०
चंद्रपूर १ ०
वाशिम १ १
अमरावती ४ १
अकोला १ ०