लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेंग्यूच्या डासांनी नागपूरकरांची झोप उडवली आहे. शासकीयसह खासगी रुग्णालये या आजाराच्या रुग्णांनी खचाखच भरली आहेत. दिवाळीच्या उत्सावावर काहीसे विरजण पडल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात या आजाराचे ११० रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची संख्या नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या सहा जिल्हामिळून ७७९वर पोहचली आहे. तर सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले आहे. यात दोन मृत्यू व ३३७ रुग्णांची नोंद आहे.‘एडिस’ डासाच्या चावण्याने होणाऱ्या डेंग्यूने नागपूरकर चांगलेच गारद झाले आहे. शहरात २०१४मध्ये सर्वाधिक म्हणजे ६०१ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर २०१५ मध्ये २३०, २०१६ मध्ये १९५ तर २०१७ मध्ये २०० रुग्ण आढळून आले होते. परंतु या वर्षी हा आकडा आतापर्यंत २४३ वर पोहचला आहे. तर नागपूर ग्रामीणमध्ये दोन मृत्यू व ९४ रुग्णांची नोंद आहे. नागपूर विभागाचा विचार केल्यास नागपूर जिल्ह्यानंतर सर्वाधिक रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात आढळून आले आहेत. रुग्णांची ही संख्या २७५वर गेली आहे. वर्धा जिल्ह्यात १५१ रुग्ण, गोंदिया तीन तर गडचिरोली जिल्ह्यात ११ रुग्ण आढळून आले आहेत.सर्वाधिक मृत्यू वर्धा जिल्ह्यातया वर्षी डेंग्यूचे सर्वाधिक मृत्यू वर्धा जिल्ह्यात झाले आहेत. या जिल्ह्यात जानेवारी ते आतापर्यंत १५१ रुग्ण आढळून आले असून यातील पाच रुग्णांचे बळी गेले आहेत. आरोग्य विभाग याकडे विशेष लक्ष देऊन असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.नागपुरात कठोर उपाययोजनांकडे दुर्लक्षनागपूर शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना शासनाकडून वेळीच उपाययोजना झाल्या नाहीत. घराघरांची तपासणी करून डेंग्यू अळ्या शोधण्याचे व फवारणीचेच कार्य एवढ्यापुरतेच महानगरपालिकेचे आरोग्य विभागत मर्यादित राहिले आहे. वेळीच मनुष्यबळ, अद्यावत यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली असती आणि डेंग्यू अळ्या आढळून येणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार दिले असते तर आज चित्र वेगळे असते असे, तज्ज्ञांचे म्हणणे आहे.नागरिकांनी गंभीरतेने घ्यावेडेंग्यूला कारणीभूत असलेले एडीस डास हे जास्त करून शहरी वस्त्यांत आढळतात. या डासांवर पांढरे पट्टे असल्यामुळे ओळखायला सोपे जाते. रिकामे डबे, मडकी, चाकांचे टायर्स इत्यादींमध्ये साचलेल्या पाण्यात हे डास लवकर फैलावतात. यामुळे यातले पाणी दर आठवड्याला काढून त्यांचा तळ ब्रशने घासावा लागतो तरच चिकटलेली अंडी निघतात. डेंग्यूवर उपचार नाही, दिसून आलेल्या लक्षणांवर उपचार केला जातो. यामुळे या डासाची उत्पत्तीच होणार नाही यासाठी प्रत्येक नागरिकाने याला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे.डॉ. संजय जयस्वालउपसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग
डेंग्यू रुग्णांची संख्या ७७९ वर, सात जणांच्या मृत्यूची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 8:45 PM
डेंग्यूच्या डासांनी नागपूरकरांची झोप उडवली आहे. शासकीयसह खासगी रुग्णालये या आजाराच्या रुग्णांनी खचाखच भरली आहेत. दिवाळीच्या उत्सावावर काहीसे विरजण पडल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात या आजाराचे ११० रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची संख्या नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या सहा जिल्हामिळून ७७९वर पोहचली आहे. तर सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले आहे. यात दोन मृत्यू व ३३७ रुग्णांची नोंद आहे.
ठळक मुद्देसर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात