लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरण प्रशासनाकडून सध्या हाती घेण्यात आलेल्या अंतर्गत मनुष्यबळ पुनर्रचना कार्यक्रमात कर्मचाऱ्यांची कोठेही कपात होणार नसून, उलटपक्षी उपविभागीय आणि शाखा कार्यालयांची संख्या वाढणार असल्याने भविष्यात अधिक मनुष्यबळ लागण्याची शक्यता असल्याने अधिकारी आणि कर्मचारी यांनी मनातून भीती काढून टाकावी, असे आवाहन महावितरणचे कार्यकारी संचालक (पायाभुत आराखडा) प्रसाद रेशमे यांनी नागपूर येथे आयोजित अधिकारी आणि कर्मचारी मेळाव्यात केले.महावितरणमध्ये पुढील महिन्यापासून पुनर्रचना कार्यक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबाजवणी करण्यात येणार आहे. याची माहिती देण्यासाठी काटोल रोड येथील विद्युत भवनातील महावितरणच्या कार्यालयात कार्यकारी संचालक रेशमे यांनी शुक्रवारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासमवेत संवाद साधला. यावेळी बोलताना रेशमे म्हणाले की, महावितरणची पुनर्रचना वीज ग्राहक आणि कर्मऱ्यांच्या हितावह असून पुनर्रचनेमुळे राज्यात ४६ नवीन उपविभाग कार्यालये आणि ९२ शाखा कार्यालये सुरु होणार आहेत.वीज ग्राहकांच्या तक्रारीची दखल शाखा कार्यालयात घेतल्या जाते मात्र नव्या रचनेत उपविभागीय पातळीवरून या तक्रारीची दखल घेऊन ती सोडवली जाणार आहे. परिणामी जनमित्रांच्या कामाचा ताण कमी होणार आहे. याशिवाय उपकेंद्राची आणि वीज वाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी विभागीय पातळीवर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याच्या नेतृत्वात पथक कार्यरत राहणार आहे. या पुनर्रचनेमुळे काही ठिकाणी कर्मचारी अतिरिक्त होणार असले तरी त्याला जवळच्या विभागात अथवा मंडल कार्यालयात समायोजित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. सोबतच काही ठिकाणी नवीन शाखा आणि उपविभागीय कार्यालये सुरु होणार असल्याने अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे तेथेही समायोजन करणे शक्य आहे. अशा अधिकारी-कर्मचाºयांची सेवाज्येष्ठता किंवा घटनादत्त आरक्षणास धक्का लागणार नाही असेही रेशमे यांनी स्पष्ट केले.यावेळी नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी संचालक दिलीप घुगल, मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी, महाव्यस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता उमेश शहारे, नारायण आमझरे, दिलीप दोडके, हरीश गजबे, बंडू वासनिक, कार्यकारी अभियंता कुंदन भिसे, दीपाली माडेलवार, अमित परांजपे, प्रफुल लांडे, सहायक महाव्यस्थापक (मानव संसाधान) वैभव थोरात उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी केले.ग्राहक तक्रारी आणि वीज बिल वसुलीसाठी वेगळे पथक राहणारशाखा आणि उपविभागीय कार्यालयात कार्यरत कर्मचारी वर्गाला सध्या अनेक प्रकारची कामे करावी लागतात. परिणामी त्यांच्यावर कामाचा ताण येतो आहे. महावितरण प्रशासनकडून याची दखल घेत मनुष्यबळ पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या रचनेत ग्राहक तक्रारी, देखभाल आणि दुरुस्तीसाठी मोठ्या शहरी भागात उपविभागीय पातळीवर वेगळे कर्मचारी कार्यरत राहणार असून वीज बिल वसुलीसाठी वेगळे कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.