लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’च्या वाढत्या संकटात शहरातील ‘क्वारंटाईन’ केंद्रांमध्ये ठेवल्या जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढीस लागली आहे. हा आकडा आता दोन हजाराच्या वर गेला आहे. गुरुवारी या केंद्रांमध्ये आणखी १६८ लोक आणल्या गेले असून शहरातील विविध केंद्रांत २ हजार ८९ लोक ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहेत.‘कोरोना’ चाचणीत ‘पॉझिटिव्ह’ आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून या केंद्रांत ठेवले जात आहे. मार्च महिन्यात परदेशातून येणाऱ्या नागरिकांना ठेवण्यासाठी आमदार निवासातील केंद्रात व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढल्याने इतर ठिकाणीदेखील ‘क्वारंटाईन’ केंद्र सुरू करण्यात आले. गुरुवारी १६८ लोकांना या केंद्रांत आणल्या गेले. यात पार्वतीनगरातील ८० हून अधिक लोक आहेत. बुधवारी रात्रीदेखील दीडशे लोकांना आणण्यात आले.दुसरीकडे ‘क्वारंटाईन’ केंद्रांचा विरोधदेखील होत आहे. वानाडोंगरी, पाचपावली, राजनगर स्थित ‘क्वारंटाईन’ केंद्रांचा विरोध झाला आहे. या केंद्रांमधून २३ जणांना कुठलीही लक्षणे नसल्याने घरी पाठविण्यात आले. तर ११ जणांना इस्पितळात भरती करावे लागले. याशिवाय शहरात ४२३ लोकांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले असून त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत आहे.बसेसमध्ये ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ नाही‘पॉझिटिव्ह’ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना बसेसच्या माध्यमातून ‘क्वारंटाईन’ केंद्रांवर नेले जात आहे. या प्रक्रियेत ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन होत नसल्याचा आरोप मनपाच्या आरोग्य सभापतींनी लावला आहे. सतरंजीपुरा, मोमिनपुरा तसेच पार्वतीनगर येथील लोकांना बसेसमधून नेण्यात आले, परंतु अंतराच्या नियमांचे पालन झाले नाही. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका होऊ शकतो.अशी आहे आकडेवारी (६ मेची आकडेवारी)आमदार निवास २९१वनामती ७सिम्बॉयसिस ४३२रविभवन ३२हॉटेल ७२पाचपावली ६४४व्हीएनआयटी ६११आमदार निवासात सर्वाधिक ‘क्वॉरंटाईन’शहरातील सात ‘क्वॉरंटाईन’ केंद्रांवर आतापर्यंत ३ हजार ५८३ लोकांना आणून त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली. त्यातील १ हजार ४८४ नागरिकांना घरी पाठविण्यात आले किंवा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत २ हजार ८९ नागरिक तेथे आहेत. सर्वाधिक १ हजार १४२ लोक आमदार निवासात आणले गेले.
नागपुरात ‘क्वारंटाईन’ केलेल्यांची संख्या दोन हजारावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 2:11 AM
‘कोरोना’च्या वाढत्या संकटात शहरातील ‘क्वारंटाईन’ केंद्रांमध्ये ठेवल्या जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढीस लागली आहे. हा आकडा आता दोन हजाराच्या वर गेला आहे. गुरुवारी या केंद्रांमध्ये आणखी १६८ लोक आणल्या गेले असून शहरातील विविध केंद्रांत २ हजार ८९ लोक ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहेत.
ठळक मुद्देकेंद्रांमध्ये वाढतेय संख्या : घरांमध्ये सव्वाचारशे लोक ‘क्वारंटाईन’