लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळा संपला तरी स्वाईन फ्लूची दहशत कमी झालेली नाही. नागपूर विभागात आतापर्यंत ६२६ रुग्ण आढळून आले असून ११३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी पुन्हा तीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. सध्याच्या घडीला विविध शासकीय व खासगी रुग्णालयात ११० रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आहे.उपराजधानीला स्वाईन फ्लूचा वाढता विळखा धोकादायक ठरत आहे. आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्यामाहितीनुसार शहरात जानेवारी ते आतापर्यंत ३२१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्या पाठोपाठ नागपूर जिल्ह्यात ६९ रुग्ण आढळून आले आहे. या विभागांतर्गत येणाºया चंद्रपूरमध्येही सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. येथे ४० रुग्ण आढळून आले. अमरावती जिल्ह्यात ३१, भंडारा जिल्ह्यात २०, यवतमाळ जिल्ह्यात २०, गोंदिया जिल्ह्यात ११, गडचिरोली व अकोला जिल्ह्यात प्रत्येकी ५, बुलडाण्यात १ रुग्ण आढळून आला. इतर राज्यामधून नागपुरात येऊन उपचार घेणाºया रुग्णांची संख्याही मोठी आहे. मध्य प्रदेश येथून ८६, छत्तीसगड येथून ४ तर तेलंगणा येथून एका रुग्णाने उपचार घेतला.४५३ रुग्ण झाले बरेएकीकडे स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येतही भर पडत आहे. नागपूर विभागात आतापर्यंत ६२६ रुग्ण आढळून आले असता यातील ४५३ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचारआरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी सांगितले की, स्वाईन फ्लूवरील आवश्यक औषधे सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर मोफत उपचार व्हावा म्हणून आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला आहे.
स्वाईन फ्लूचा आकडा ६२६वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:51 IST
पावसाळा संपला तरी स्वाईन फ्लूची दहशत कमी झालेली नाही. नागपूर विभागात आतापर्यंत ६२६ रुग्ण आढळून आले असून ११३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
स्वाईन फ्लूचा आकडा ६२६वर
ठळक मुद्दे११३ रुग्णांचा मृत्यू : हिवाळ्यातही दिसून येत आहे रुग्ण