लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ रुग्णांची संख्या वाढत असल्याने मनपाच्या केंद्रांवर चाचणीसाठी लोकांची गर्दी होत आहे. यामुळे केंद्रावर ताण वाढत आहे. सध्या ३४ केंद्रावर चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. चाचणीसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी व्हावी, यासाठी चाचणी केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शनिवारी दिली.कोरोनाचे संकट मोठे आहे. मागील काही दिवसात नागपूर शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, सोबतच मृत्यूची संख्याही वाढली आहे. याला आळा घालण्यासाठी महापालिकेची यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्त्वाचा असून तो वाचावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्तांनी ‘लोकमत’ला सांगितले.आजार वाढण्याची प्रतीक्षा न करता लक्षणे दिसताच तातडीने तपासणी करून उपचार घ्यावेत. कोविडमुळे दगावणाऱ्यात ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याचा विचार करता महापालिका, पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी आॅक्सिजन लेव्हलची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांनी तपासणीसाठी येणाºया पथकाला सहकार्य करावे. नागरिकांना वेळीच उपचार मिळावेत. त्यांचा जीव वाचावा यासाठी ही मोहीम हाती घेतल्याची माहिती आयुक्तांनी दिली.गर्दी असलेल्या सेंटरची क्षमता वाढविणारकाही केंद्रावर चाचणीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे अशा केंद्रांची क्षमता वाढविली जाईल. यासाठी औषध यंत्रणा उभारण्यासंदर्भात आरोग्य विभागाला निर्देश दिले जातील. तपासणीसाठी येणारा कोणताही रुग्ण परत जाणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे, असा विश्वास राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केला.‘लाईव्ह अॅप’वरील तक्रारी सोडविणारमहापालिकेच्या लाईव्ह अॅपवर येणाऱ्या तक्रारी यापुढेही सोडविल्या जातील, परंतु सध्या कोविड-१९ चे संकट मोठे आहे. नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत, यावर मनपा प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. विविध बाबींचा आढावा घेत असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासोबतच आर्थिक स्थितीत सुधारणा व विकासाला गती देण्याचा प्रयत्न असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
नागपुरात चाचणी केंद्रांची संख्या वाढवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 11:41 PM