नागपूर : विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे दोन तास काम बंद करून आंदोलन केले. सकाळी ८ ते १० या वेळेत परिचारिका काम बंद करून आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे आरोग्य सेवा प्रभावित झाली होती. संघटनेने सांगितले की, २२ जून रोजी दोन तास काम बंद ठेवून आंदोलन केले जाईल. दरम्यान, परिचारिकांनी घोषणा देत मागण्या पूर्ण न झाल्यास २३ व २४ जून रोजी पूर्णवेळ काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतरही सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्यास २५ जूनपासून बेमुदत काम बंद करण्यात येईल, असे स्पष्ट केले. यावेळी परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष एकता रंगारी, उपाध्यक्ष यशस्वी बोदेले, सचिव समीक्षा समुद्रे, सहसचिव धनंजय जुमळे, कोषाध्यक्ष आकाश सावळे, अंकुश खोरगडे, उषा, नीलिमा जाधव, अतुल धोटे आदी उपस्थित होते.
परिचारिकांनी दोन तास काम बंद ठेवून केले आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 4:07 AM