शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

वसतीगृह, स्वाधारसाठी ओबीसी विद्यार्थी संघटना आक्रमक, आंदोलनाचा दिला इशारा

By निशांत वानखेडे | Published: September 04, 2023 6:11 PM

आठवड्यात निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन : मुख्यमंत्री, वित्तमंत्र्यांना निवेदन

नागपूर : इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन अशी ७२ वसतीगृहे, आधार योजना व परदेशी शिष्यवृत्तीच्या मुद्द्यावरून ओबीसी विद्यार्थी संघटनांनी सरकारला इशारा दिला आहे. या विषयांवर आठ दिवसात सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा आंदोलनाची घोषणा संघटनेने केली आहे.

ओबीसी युवा अधिकार मंचच्यावतीने संयोजक उमेश कोर्राम यांच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हाधिकारी, साहाय्यक आयुक्त सामजिक न्याय, नागपूर आणि व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती नागपूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्र्यांना महाराष्ट्र शासन यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मंचचे कृतल आकारे, पंकज सावरबांधे, पियूष आकरे, आकाश वैद्य, प्रतीक बावनकर, विशाल पटले, नयन काळबांधे उपस्थित होते.

२९ डिसेंबर २०१२ रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान तत्कालिन उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्यात मुलांमुलींसाठी दोन वसतीगृह, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्वाधारच्या धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आधार योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. जिल्हानिहाय वसतिगृहे सुरू करण्याबाबत मार्गदर्शन सूचना व नियमावली निश्चित करण्यासंबंधी १३ मार्च २०२३ रोजी शासन परिपत्रकाद्वारे प्रशासनास सूचना देण्यात आल्या होत्या. यानंतर २० जुलै २०२३ रोजी पावसाळी अधिवेशनात इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री यांनीही याबाबत वसतीगृह व आधार योजनेला नियोजन विभागाची मान्यता मिळाल्याचे उत्तर दिले होते.

मात्र आजपर्यंत ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी एकही वसतिगृह सुरू झालेला नाही, कारण वित्त विभागाकडून निधी वितरीत केला गेला नाही, आधार योजनेला अजूनही वित्त विभागाची मान्यता मिळाली नाही आणि परदेशी शिष्यवृत्ती योजनेत संख्या वाढविण्यासाठी सुद्धा वित्त विभागाची मान्यता मिळाली नाही. ११ सप्टेंबरपर्यंत या विषयांवर सकारात्मक निर्णय झाला नाही तर शासनाकडे निधीची कमतरता आहे असे समजून १२ सप्टेंबरपासून राज्यभर भीक मांगो आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा काेर्राम यांनी दिला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीOBCअन्य मागासवर्गीय जातीnagpurनागपूर