नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासंबंधी घोषणा केली आहे. मात्र, हे करीत असताना कुठल्याही प्रकारे ओबीसी समाजावर अन्याय होईल, असा निर्णय राज्य सरकार करणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्रर्फ फडणवीस यांनी पुन्हा एकदा ओबीसी समाजाला आश्वस्त केले. शुक्रवारी नागपुरात पत्रकारकांशी बोलताना फडणवीस म्हणाले, मी पहिल्यांदा तर सर्व समाजाला विनंती करू इच्छितो की महाराष्ट्रात कुठलेही समाज एकमेकांसमोर उभे आहेत अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणे योग्य नाह. ओबीसी समाजाला आश्वस्त करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीत राज्य सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. वन ट्रिलियन इकॉनॉमीबाबत बोलताना ते म्हणाले, इकॉनॉमिक ॲडव्हायझर अकाउंट ने ज्या काही शिफारसी केल्या होत्या त्या संदर्भातील एक रोड मॅप प्रेझेंटेशन मंत्रिमंडळापुढे करण्यात आले आणि या शिफारशी कशा प्रकारे लागू करायच्या, त्याचा क्रम काय असला पाहिजे, गुंतवणूक कशी आणायची, अशा प्रकारचा रोड मॅप तयार करण्यात आला आहे. त्या दृष्टीने आता पुढची कारवाई होईल. चांगली सुरुवात झाली आहे आणि त्यातून निश्चितपणे गुंतवणूक वाढवून रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करत आपल्याला अर्थव्यवस्थेला चालना देता येईल.
नागपुरात रुग्णालय आपल्या दारी मायनिंग फंडातून गोरगरीब लोकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी योजना नागपुरातून सुरू करीत आहोत. नागपूर मध्ये विशेषतः रुग्णालय आपल्या दारी हा उपक्रम सुरू करणार आहोत. ज्यामुळे गरिबांना दारावर आरोग्यसेवा उपलब्ध होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.