शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

परवानगीसाठी गणेश मंडळांची अडवणूक : झोनस्तरावर यंत्रणा सक्षम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 9:18 PM

गणरायाचे आगमन पाच दिवसावर आले असतानाही महापालिकेची झोनस्तरावर यंत्रणा सक्षमपणे कार्यरत नसल्याने गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देमनपा प्रशासन निर्देश देऊन मोकळे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना विविध विभागाची परवानगी घ्यावी लागते. यामुळे होणारा त्रास कमी व्हावा, याकरिता परवानगीसाठी महापालिकेतर्फे झोनस्तरावर एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. प्रशासनाने यासंदर्भात झोन अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. मात्र गणरायाचे आगमन पाच दिवसावर आले असतानाही महापालिकेची झोनस्तरावर यंत्रणा सक्षमपणे कार्यरत नसल्याने गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.गणेशोत्सवाच्या मंडपासाठी महापालिकेच्या झोनचे सहायक आयुक्त व वाहतूक विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण वा एसएनडीएलकडून वीजजोडणीसाठी आवश्यक असलेली परवानगी घ्यावयाची आहे. यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना भटकंती करण्याची गरज भासू नये, यासाठी सर्व १० झोन तसेच महापालिकेच्या सिव्हिल कार्यालयात परवानगी देण्याची यंत्रणा सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र महापालिकेच्या विविध विभागात समन्वयाचा अभाव आहे. एक खिडकी कक्षात संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित नसतात. यामुळे परवानगीसाठी येणाऱ्यांना ताटकळत बसावे लागते, अशी तक्रार मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. आठ दिवसापूर्वी अर्ज केला असतानाही अद्याप अनेकांना परवानगी मिळालेली नाही. २ सप्टेंबरला गणरायांचे आगमन होत आहे. त्यात रविवार सुटीचा दिवस असल्याने परवनगीसाठी चारच दिवस आहेत.तीन-चारच दिवस असल्याने परवानगीसाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होणार आहे. याचा महापालिका प्रशासनाने विचार केलेला दिसत नाही.परवानगी न घेतल्यास कायदेशीर कारवाईगणेशोत्सव मंडळांनी परवानगी न घेता गणेशमूर्ती बसविल्यास उभारण्यात आलेला मंडप अवैध ठरवून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. १५० चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्र वा ५० पेक्षा जास्त लोकांची व्यवस्था असल्यास अग्निशमन विभागाची स्वतंत्र परवानगी घेणे आवश्यक आहे. मंडप उभारताना आग नियंत्रणाची व्यवस्था करणे बंधनकारक आहे.झोन अधिकाऱ्यांना निर्देशगणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना परवानगी देण्यासाठी झोनस्तरावर एक खिडकी योजना सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकाच ठिकाणी आवश्यक असलेल्या परवानगी देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. निर्देशानुसार यंत्रणा उभारण्यात आली की नाही, याचा आढावा घेणार आहे.राजेश मोहिते, उपायुक्त मनपामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची धावपळअर्ज दिल्यावर संबंधित कर्मचारी तातडीने परवानगी देत नसल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. उत्सव जवळ आल्यानंतरही परवानगी मिळत नसल्याने यंदा काय होणार, अशी भीती अनेक मंडळांपुढे आहे. सजावटीसह गणेशोत्सवासाठी इतरही कामे करावयाची असल्याने पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. जोवर परवानगी मिळत नाही, तोवर काही खरे नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. परवानगीसाठी किती अर्ज आले, मंजुरी किती जणांना दिली, याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नाही. संबंधित विभागात समन्वय नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका