अपघातासाठी कारणीभूत ठरू शकणाऱ्या या फांद्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे अपघात होण्याची वाट पाहण्यात येत आहे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. संबंधित एजन्सीला हा धोका कळला असूनही त्याबाबत निष्काळजीपणा करण्यात येत आहे. हा पूल तोडण्यात येणार असल्यामुळे त्याची उपेक्षा तर होत नाही ना, अशी शंकाही उपस्थित करण्यात येत आहे. मोठ्या वाहनांना ओव्हरटेक करताना वाहन किंवा कारचा अपघात या फांद्यामुळे होऊ शकतो. येथील झाडाच्या फांद्या दाट झाल्या असूनही महापालिका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. या फांद्या तोडणे सहज शक्य आहे. उड्डाणपुलासोबतच खालील रस्त्याच्या खांबावरील विजेच्या तारांनाही या फांद्या स्पर्श करीत आहेत. परंतु, महावितरणही याकडे लक्ष देत नसल्याची स्थिती आहे. हे दृष्य पाहून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे जाणवत असून, सुरक्षेला दुय्यम स्थान देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
..............