अकोला : नाताळानिमित्त २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान बहुतांश रेल्वेगाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले असून, दिवाळीच्या तुलनेत नाताळातील सुट्यांमध्ये प्रवासाचे नियोजन करणार्यांचे प्रमाण जास्त असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भूसावळ मंडळ अधिकार्यांनी दिली. विधानसभा निवडणूक दिवाळीपूर्वीच आटोपली; मात्र तरीही दिवाळीच्या सुट्यांमध्ये अनेकांनी प्रवास टाळला. डिसेंबरमध्ये नाताळाच्या सुट्या इच्छित स् थळी घालविण्याचा बेत आखणार्यांनी दोन महिने आधीच आरक्षण केले आहे. परिणामी, २५ ते ३१ डिसेंबर दरम्यान मुंबई, पुणे, अहमदाबाद, नागपूर, हावडा, भूसावळ, अकोला व नागपूर जंक्शन रेल्वे स्थानकांवरून धावणार्या सर्व सु परफास्ट गाड्यांचे आरक्षण झाले असतानाही, प्रवाशांनी आरक्षणाची मागणी केल्याने त्यांना प्रतिक्षा यादीमध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती भूसावळ मंडळ अधिकार्यांनी दिली. *द. मध्यच्या गाड्यांवर गर्दी वाढलीमध्य रेल्वेप्रमाणेच दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला मार्गे धावणार्या गाड्यांची सं ख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे गाड्या बदलण्याचा त्रास राहिला नसल्याने थेट अकोल्याहून प्रवास सुरू करणार्यांची संख्यादेखील दिवसागणिक वाढत चालली आहे. लांब पल्ल्याच्या या मार्गावर अनेक गाड्या सुरू झाल्याने नवीन-नवीन ठिकाणांना भेटी देण्यासाठी आतूर असलेल्या वैदर्भीयांनी द. मध्यच्या गाड्यांचा कोटादेखील नाताळाच्या सुट्यांमध्ये पूर्ण केला असल्याची माहिती द. मध्यच्या नांदेड येथील मंडळ अधिकार्यांनी दिली. आगामी काळात मध्य व दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने आणखी काही गाड्या ठराविक कालावधीसाठी सुरू होण्याची शक्यता असल्याचे अधिकार्यांनी सांगि तले.
नाताळानिमित्त मध्य रेल्वेच्या गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल
By admin | Published: November 14, 2014 10:50 PM