शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

पाचपावली ठाण्याला घेराव

By admin | Published: January 01, 2016 4:40 AM

संशयास्पद मृत्यू झालेल्या जरीपटक्यातील राहुल प्रेमदास राऊत (वय २४) नामक तरुणाच्या नातेवाईकांना पोलिसांच्या

नागपूर : संशयास्पद मृत्यू झालेल्या जरीपटक्यातील राहुल प्रेमदास राऊत (वय २४) नामक तरुणाच्या नातेवाईकांना पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे त्याच्यावर अंतिम संस्कार करता आले नाही. मोठ्या प्रमाणात नातेवाईक असतानादेखील राहुलला पोलिसांनी बेवारस समजून त्याचा मृतदेह पुरला. हा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर गुरुवारी दुपारी शिवसैनिक आणि मृताच्या नातेवाईकांनी पाचपावली ठाण्याला घेराव घालून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे ठाण्याच्या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी करून कडक कारवाईचे आश्वासन दिल्यामुळे तासाभरानंतर जमाव शांत झाला. जरीपटक्यातील संत कबीरनगरात राहणारा राहुल ११ आॅक्टोबरपासून बेपत्ता होता. नातेवाईकांनी जरीपटका ठाण्यात राहुलच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदविण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. मात्र, टोलवाटोलवी करीत पोलिसांनी शोध घ्या, वाट बघा, असा सल्ला देत त्यांची दखल घेतली नाही. तीन दिवसानंतर मिसिंग दाखल करून पोलीस गप्प बसले. दुसरीकडे कामठी मार्गावरील जलसा बारजवळ त्याचा मृतदेह १२ आॅक्टोबरला संशयास्पद अवस्थेत आढळला. पाचपावली पोलिसांनी त्याची ओळख पटली नसल्यामुळे १५ आॅक्टोबरला त्याचा मृतदेह पुरला. राहुल महापालिकेच्या वीज विभागात कंत्राटी कामगार होता. तो घरातील सर्वात मोठा होता. त्याचे वडील वीज मंडळात आहेत, तर आई ललूबाई गृहिणी आहे. त्याला कुंदा नामक बहीण असून, छोटा भाऊ केतन खासगी वाहन चालवतो. शिवसैनिक असलेल्या राहुलच्या शोधार्थ त्याचे अस्वस्थ नातेवाईक आणि मित्र इकडे-तिकडे प्रयत्न करीत होते. काही दिवसांपूर्वी राहुलचा मोबाईल मार्टिननगरातील राजेश नामक तरुणाकडे आढळला. त्यामुळे राहुलच्या मित्रांनी राजेशला पकडून चौकशी केली. त्याने हा मोबाईल दुसऱ्या एकाकडून खरेदी केल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्याने राहुलसोबत काही तरुणांचा वाद झाल्याची आणि मारहाण केल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी)अवघी वस्तीच ठाण्यात पोहचलीया घटनाक्रमानंतर राहुलचा मृत्यू झाल्याचे आणि पोलिसांनी त्याचा मृतदेह पुरल्याचेही उघडकीस आले. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी माजी महापौर किशोर कुमेरिया, शिवसेनेचे सुनील बॅनर्जी, मनोज शाहू, सूरज गोजे, जितू तिवारी तसेच शेकडो शिवसैनिकांसह राहुल राहत असलेली अवघी वस्तीच गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास पाचपावली ठाण्याला घेराव करण्यासाठी पोहचली. राहुलच्या मृत्यूची कसून चौकशी करा, आरोपींना अटक करा आणि या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करा, अशी मागणी जमाव करू लागला. घोषणाबाजीसोबत तणाव वाढत असल्याचे पाहून पाचपावलीचे ठाणेदार राजेंद्र निकम यांनी वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यानंतर उपायुक्त संजय लाटकर ठाण्यात पोहचले. त्यांनी जरीपटक्याचे ठाणेदार संजय सांगोले यांनाही बोलवून घेतले. राहुलच्या संशयास्पद मृत्यूची कसून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे त्यांनी नातेवाईकांना आश्वासन दिले. तसेच राहुलच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवून घेण्यास आणि त्याची तातडीने सर्वत्र माहिती न देण्यास कोण कारणीभूत आहे, त्याचीही चौकशी करू, दोषी पोलिसावर कडक कारवाई करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर जमाव शांत झाला.राहुलची हत्याच झाल्याचा आरोपपुढे आलेल्या घटनाक्रमातून राहुलचा संशयास्पद मृत्यू हत्येचाच प्रकार आहे, असा आरोप त्याचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी लावला आहे. ११ आॅक्टोबरच्या रात्री राहुलसोबत असलेल्या आणि त्याचा मोबाईल घेऊन पळणाऱ्याला बोलते केल्यास या प्रकरणातील तथ्य उघडकीस येतील. मोबाईलच्या कॉल डिटेल्सवरूनही अनेक बाबी उघड होऊ शकतात, असा दावा शिवसैनिक करीत आहेत. जरीपटक्याचे दुसरे प्रकरण हलगर्जीपणामुळे बेपत्ता झालेल्याचा मृत्यू होण्याचे आणि परस्पर त्याचा मृतदेह पुरल्याचे जरीपटका ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील हे दुसरे संतापजनक प्रकरण आहे. दोन बालकांचे अपहरण करून दोघांचीही हत्या झाल्याचा संतापजनक प्रकार महिनाभरापूर्वी घडला. मुलांच्या आईवडिलांनी या प्रकरणाची (बेपत्ता होण्याची) तक्रार देऊनही जरीपटका पोलिसांनी ते गांभीर्याने घेतले नव्हते. त्यामुळे अपहरणकर्त्याने दोन निरागस जीवाची मध्य प्रदेशात नेऊन हत्या केली. हत्येपूर्वी मुलीवर अत्याचारही केला. जरीपटका ठाण्याला त्यामुळे जमावाने घेराव घातला होता. केवळ एकच महिना या प्रकाराला झाला. पोलिसांनी या प्रकरणातही असाच हलगर्जीपणा केला. लगेच राहुलच्या बेपत्ता होण्याची तक्रार घेऊन सर्व पोलीस ठाण्यात माहिती दिली असती तर राहुलच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांना त्याच्यावर किमान अंत्यसंस्कार करता आले असते. हयात असतानाही राहुलवर बेवारस समजून अंत्यसंस्कार झाले. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच हे घडले. त्यामुळे राहुलच्या नातेवाईकांना आयुष्यभर ती सल राहणार आहे.