लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ओळखीच्या तरुणीचे फेसबुक अकाऊंट हॅक करून आक्षेपार्ह कृती करणाऱ्या आरोपीला हुडकून काढण्यात गुन्हे शाखेतील सायबर सेलने यश मिळवले. अर्जुन संजय वानखेडे (वय २१) असे त्याचे नाव असून, तो त्रिमूर्तीनगरातील रहिवासी आहे.जानेवारी महिन्यात संजयने एका फेसबुक फ्रेण्डचे फेसबुक अकाऊंट हॅक केले. त्यावरून तो आक्षेपार्ह कृती करू लागला. ही बाब लक्षात आल्यानंतर २४ जानेवारीला संबंधित तरुणीने धंतोली पोलीस ठाण्यात धाव घेतली. हा गुन्हा सायबर अॅक्टमध्ये येत असल्याने पोलिसांनी तो गुन्हे शाखेकडे वर्ग केला. पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, सहायक आयुक्त डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पिदूरकर, उपनिरीक्षक डोर्लीकर आणि शिपाई अमित यांनी चौकशी करून अर्जुन वानखेडेला अटक केली. आरोपी वानखेडे हा पॉलिटेक्निकचा विद्यार्थी असून, मैत्रीभंगामुळे त्याने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.
नागपुरात फेसबुक अकाऊंट हॅक करून आक्षेपार्ह कृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:34 AM
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ओळखीच्या तरुणीचे फेसबुक अकाऊंट हॅक करून आक्षेपार्ह कृती करणाऱ्या आरोपीला हुडकून काढण्यात गुन्हे शाखेतील सायबर सेलने यश मिळवले. अर्जुन संजय वानखेडे (वय २१) असे त्याचे नाव असून, तो त्रिमूर्तीनगरातील रहिवासी आहे.जानेवारी महिन्यात संजयने एका फेसबुक फ्रेण्डचे फेसबुक अकाऊंट हॅक केले. त्यावरून तो आक्षेपार्ह कृती करू लागला. ...
ठळक मुद्देमैत्रीभंगामुळे कृत्य : आरोपी पॉलिटेक्निकचा विद्यार्थी