सावनेर : काेराेना संक्रमण कमी हाेताच राज्य शासनाच्या आदेशानुसार इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये याेग्य उपाययाेजना करण्यात आल्या नाही, याची तपासणी करण्यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी मंगळवारी सावनेर तालुक्यातील विविध शाळांना भेटी देत, प्रत्यक्ष पाहणी करून उपाययाेजनांचा आढावा घेतला.
या अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देत प्रत्येक वर्गखाेलीची बारकाईने पाहणी केली. शाळांमधील शिक्षकांनी बैठक घेऊन त्यांना काेरेाना संक्रमण टाळण्याबाबतच्या विविध उपाययाेजनांची विस्तृत माहिती दिली. शिक्षकांनी शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची विशेष काळजी घेण्याचे तसेच सतर्क राहण्याचे आवाहनदेखील केले. या पाहणी दाैऱ्यात पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी अनिल नागणे, गटशिक्षणाधिकारी विजय भाकरे, मुख्याध्यापक कृष्णकांत पांडव यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी सहभागी झाले हाेते.