आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या पैशांची खुली लूट सुरू आहे. गलेलठ्ठ पगार असलेल्या अधिकाऱ्यांना वाहन भत्त्याशिवाय मोबाईल व इंटरनेटसाठीदेखील भत्ता हवा आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांनी यासाठी प्रशासनाकडे अर्जदेखील केला आहे. मोबाईल व इंटरनेटसाठी बराच खर्च होत असल्याचे यात कारण देण्यात आले आहे.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार विद्यापीठ या अधिकाऱ्यांच्या प्रस्तावावर विचारदेखील करत आहे.त्यांना मोबाईल भत्ता म्हणून पंधराशे रुपये तर इंटरनेट भत्ता म्हणून ५०० रुपये देण्याची तयारी सुरू आहे.मात्र आश्चर्याची बाब म्हणजे मोबाईल फोन सेवा अतिशय स्वस्त असून ३०० रुपयांच्या आत दिवसाला मोफत कॉलिंगसह १ जीबी डाटा हज उपलब्ध होत आहे. अशा स्थितीत अधिकाऱ्यांना दोन हजार रुपये देणे कितपत योग्य ठरेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रमाणेच काही कनिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील भत्त्याची मागणी करणे सुरू केले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोबाईल तसेच इंटरनेट भत्त्याच्या नावाखाली दरवर्षी लाखो रुपये खर्च होत आहे. कोणत्या अधिकारी व कर्मचाऱ्याला किती भत्ता द्यायचा आहे, यासाठी नियम तयार करण्यात आले आहेत.या नियमांना १ एप्रिल २०१४ पासून लागू करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांना १५०० रुपये मोबाईल फोन भत्ता तर ५०० रुपये इंटरनेट भत्ता प्रदान केला जातो. तर द्वितीय श्रेणीच्या अधिकाऱ्यांना हजार रुपये मोबाईल भत्ता व अडीचशे रुपये इंटरनेट भत्ता दिला जातो. अतिरिक्त पदभार सांभाळणाऱ्यांनादेखील मोबाईल भत्त्यापोटी पंधराशे तर इंटरनेट भत्ता म्हणून पाचशे रुपयेदिले जातात.
नागपूर विद्यापीठातील अधिकाऱ्यांना हवाय दोन हजारांचा मोबाईलभत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:50 AM