लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : नरखेड तालुक्याच्या शेवटच्या टाेकावर असलेल्या सायवाडा येथे काेराेनाला हद्दपार करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी एकवटले आहेत. सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी घराेघरी जाऊन लसीकरणाबाबत जनजागृती माेहीम सुरू केली आहे. नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. ग्रामपंचायत अंतर्गतच्या प्रत्येक गावात लसीकरण शिबिराचे आयाेजन करून गावकऱ्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
गट ग्रामपंचायत सायवाडाअंतर्गत खारगड, तारा, उतारा, खलानगाेंदी या चार गावांचा समावेश आहे. मागील महिन्यात या गावांमध्ये काेराेना रुग्ण माेठ्या प्रमाणात आढळून आले. त्यामुळे गावात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययाेजना केल्या जात आहे. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी काेराेनाला हद्दपार करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहे.
प्रत्येक गावात दर आठवड्यात निर्जंतुकीकरण फवारणी केली जाते. घराेघरी भेटी देऊन नागरिकांना लसीचे महत्व पटवून दिले जात आहे. साेबतच प्रत्येक व्यक्तींनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, यासाठी ग्रामपंचायततर्फे मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे गावातील रुग्णसंख्या घटली असून, नवीन रुग्णांची वाढ पूर्णत: थांबली आहे. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाबद्दल सरपंच हरिहर चाेरे व पदाधिकाऱ्यांचे गावकऱ्यांनी काैतुक केले. तरुणांना संधी दिल्यामुळे ग्रामपंचायतमार्फत असे उपक्रम राबविले जात असल्याच्या प्रतिक्रिया दशरथ कुंभरे, श्रीकांत श्रीरामे यांनी व्यक्त केल्या.