नागपूर : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम पर्याय आहे. त्यासाठी लसीकरणात माघारलेली गावे व कोरोनाग्रस्त गावांना मदत करण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा गावागावांत उतरली असून, अशा निवडक गावांमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांचे दौरे सुरू झाले आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी मौदा तालुक्यातील तारसा, निमखेडा, अरोली, कोदामेढी, रामटेक तालुक्यातील मनसर, पारशिवनी तालुक्यातील करंभाड, सावनेर तालुक्यातील बळेगाव या ग्रामपंचायतीमध्ये आढावा बैठक घेतली. लसीकरणाने कोरोनाची गंभीरता कमी होते, हे सिद्ध झाले असल्याने लसीकरणावर भर द्यावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकारी प्रशासनाने राबविलेल्या निर्बंधामुळे कोरोनाचे संक्रमण काही प्रमाणात कमी होत आहे. रविवारी जिल्ह्यात बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे. ६५४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ३१०४ नवीन रुग्णांची नोंद झाली.