लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे इंजिनाला वीजपुरवठा करणाऱ्या ओएचई केबलची चोरी झाली. रेल्वे सुरक्षा दलाने हे केबल चोरी करून नेणाऱ्या आरोपींना अटक केली असून ही केबल खरेदी करणाऱ्या व्यावसायिकालाही ताब्यात घेतले आहे.नारायणदास जयचंददास बैरागी, अंशूल महादेव गोहिते व सुधीर नान्हू गिरहारे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. रेल्वे इंजिनाला वीजपुरवठा करण्यासाठी ओएचई केबल असते. सध्या कळमना -कोराडी सेक्शनमध्ये विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी तांब्याच्या केबल आणून ठेवण्यात आल्या आहेत. चोरट्यांनी अंधाराचा गैरफायदा घेत ६० मीटर लांबीची केबल चोरून नेली. याबाबत माहिती मिळताच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे सुरक्षा आयुक्त अरुण कुमार स्वामी यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार निरीक्षक आर. के. सिंग यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. त्यानुसार आरपीएफचे उपनिरीक्षक मोहम्मद मुगीसुद्दीन व त्यांच्या सहकाऱ्यांनी केबल चोरीची माहिती मिळविली. त्यानंतर त्यांनी धाड टाकून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ६० मीटर केबल जप्त करण्यात आली. चौकशीत त्यांनी यापूवीर्ही केबल चोरी केल्याची कबुली दिली. यापूर्वी चोरी केलेली केबल नरेश शाहूला विकल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणात एकूण २२ हजार रुपये किमतीची ७० मीटर केबल जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई विवेक कनोजिया, ईशांत दीक्षित, प्रदीप गाढवे यांनी पार पाडली. उपनिरीक्षक मोहम्मद मुगीसुद्दीन पुढील तपास करीत आहेत.
ओएचई केबल चोरणाऱ्या आरोपींना अटक : आरपीएफने लावला छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 10:45 PM
रेल्वे इंजिनाला वीजपुरवठा करणाऱ्या ओएचई केबलची चोरी झाली. रेल्वे सुरक्षा दलाने हे केबल चोरी करून नेणाऱ्या आरोपींना अटक केली असून ही केबल खरेदी करणाऱ्या व्यावसायिकालाही ताब्यात घेतले आहे.
ठळक मुद्देतीन आरोपींना घेतले ताब्यात