शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : जतमध्ये फडणवीसांच्या शिलेदाराने गड खेचून आणला; गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय
3
Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 
4
"हा महायुतीच्या एकजुटीचा विजय, जनतेसमोर नतमस्तक", देेवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
5
Mahim Vidhan Sabha Election Result 2024 Live : "एक धनवान अन् एक राजपुत्र, त्यांच्या..."; विजयानंतर महेश सावंतांची पहिली प्रतिक्रिया
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "आम्ही आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह तोडून दाखवला"; एकहाती विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
7
अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील दिग्गजांना पराभवाचा धक्का! थोरात, गडाख, तनपुरे, भांगरे पराभूत
8
Sangamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : बाळासाहेब थोरातांना पराभवाचा धक्का; नवखे अमोल खताळ ठरले जायंट किलर
9
Anushakti Nagar Vidhan Sabha Result 2024: स्वरा भास्करचा पती फहाद अहमद विरुद्ध सना मलिक, निकाल काय?
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!
11
भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुखांचा विजय; मानसिंगराव नाईकांना किती मत मिळाली?
13
अंधेरी पूर्वेत शिवसेनेच्या मुरजी पटेलांची बाजी, उबाठाच्या ऋतुजा लटकेंचा पराभव 
14
Vikhroli Vidhan Sabha Result 2024: संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांचा निकाल काय?
15
Maharashtra Assembly Election Result 2024: अमित ठाकरेंचा दारूण पराभव, बाळा नांदगावकरही हरले; राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे भारी पडले
16
प्रणिती शिंदेंना मोठा धक्का! त्यांच्याच मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पडला; भाजपने बालेकिल्ला फोडला
17
Maharashtra Assembly Election Result 2024: कांदिवली पूर्वेतून भाजपच्या अतुल भातखळकरांची हॅटट्रिक, काँग्रेसच्या कालू बढेलियांचा पराभव
18
ठरलं! 'या' दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचे काय झाले? इस्लामपूरमध्ये महायुती की मविआ जिंकले
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'अजित पवार पिछाडीवर', अशी खोटी बातमी का दाखवता? अजित पवारांचा सवाल

अबब! १०० ट्रिलियन डॉलरची नोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 8:37 PM

चलनी नोट जास्तीतजास्त किती रुपयांची असायला पाहिजे असा प्रश्न विचारल्यास कुणीही ट्रिलियन (एक लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचणार नाही. अशावेळी एखाद्या देशाने तब्बल १०० ट्रिलियन डॉलरची नोट चलनात आणली होती असे कुणी सांगितल्यास त्यावरही विश्वास बसणे कठीणच. परंतु, दुसऱ्या क्रमांकाची गोष्ट खरी असेल तर. होय, हे आपल्यासाठी आश्चर्यकारक असले तरी सत्य आहे. ही नोट रमण विज्ञान केंद्रातील वस्तू संग्रह प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. ती नोट पाहून प्रत्येक अभ्यागत अवाक होत आहे.

ठळक मुद्देअभ्यागत अवाक : वस्तू संग्रहालय प्रदर्शनाने दिला संस्मरणीय अनुभव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चलनी नोट जास्तीतजास्त किती रुपयांची असायला पाहिजे असा प्रश्न विचारल्यास कुणीही ट्रिलियन (एक लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचणार नाही. अशावेळी एखाद्या देशाने तब्बल १०० ट्रिलियन डॉलरची नोट चलनात आणली होती असे कुणी सांगितल्यास त्यावरही विश्वास बसणे कठीणच. परंतु, दुसऱ्या क्रमांकाची गोष्ट खरी असेल तर. होय, हे आपल्यासाठी आश्चर्यकारक असले तरी सत्य आहे. ही नोट रमण विज्ञान केंद्रातील वस्तू संग्रह प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. ती नोट पाहून प्रत्येक अभ्यागत अवाक होत आहे.विदेशी चलन गोळा करण्याचा छंद जोपासणारे विजय पटेल यांनी ही नोट पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्याकडे एक पैशापासून ते तब्बल १०० ट्रिलियन डॉलरपर्यंतच्या नोटा आहेत. त्यांनी सर्व नोटा प्रदर्शनात ठेवल्या आहेत. १०० ट्रिलियन डॉलरच्या नोटा झिम्बाब्वे सरकारने चलनात आणल्या होत्या. कालांतराने त्या नोटा रद्द करण्यात आल्या. त्यापैकी एक नोट पटेल यांनी अथक परिश्रम घेऊन प्राप्त केली आहे. ती नोट पटेल यांच्या संग्रहाचा मुकुटमणी आहे. याशिवाय प्रदर्शनामध्ये विविध दुर्मीळ, नावीन्यपूर्ण व कलात्मक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन अभ्यागतांना संस्मरणीय अनुभव प्रदान करीत आहे. पूजा काळबेंडे यांनी हिमालयातील पक्ष्यांची छायाचित्रे, अनिल मेश्राम यांनी भारतीय चित्रपटाच्या १०० वर्षानिमित्त प्रकाशित डाक तिकिटे, अनन्या गोंडाणे यांनी दुर्मीळ वस्तू, रूप कनोजिया यांनी जगातील पहिली प्लास्टिक नाणी, फ त्तुजी सोनवाने यांनी विविध देशांच्या चलनी नोटा, जयंत तांदुळकर यांनी काष्टकला व बॉटल कला, लक्ष्मण लोखंडे यांनी सिने अभिनेते-अभिनेत्रींच्या स्वाक्षºया, इब्राहिम खान यांनी वजनमापे, रामसिंग ठाकूर यांनी जुनी नाणी व पत्रिका, नितीन बक्षी यांनी अडकित्ते, पोस्ट कार्ड, घड्याळी, जयंत खेडकर यांनी क्युब्स व ओरिगामी कला, सुधाकर सोनार यांनी १८५४ पासूनच्या टपाल तिकिटा, अनिता सारडे यांनी ३३० ठिकाणची माती, नीलिमा मून यांनी साबण कला, अनुष्का ठाकरे यांनी शंख, राजेश चौधरी यांनी चलनी नोटा व नाणी, गंगाधर अडसर यांनी चलनी नाणी, सोहम अपराजित यांनी ओरिगामी कला, दिलीप डहाके यांनी विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींच्या स्वाक्षºया तर, कोमल खेडकर यांनी खेळण्याच्या कार्सचा संग्रह प्रदर्शनात सादर केला आहे.सोमवारपर्यंत चालेल प्रदर्शनजागतिक संग्रहालय दिवसानिमित्त रमण विज्ञान केंद्र व छंद वैभव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे प्रदर्शन २१ मेपर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान, सकाळी ११.३० ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत प्रदर्शनाला भेट देता येईल. वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेचे माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ. बी. आर. अंधारे यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी रमण विज्ञान केंद्राचे संचालक एन. रामदास अय्यर व छंद वैभव संस्थेचे अध्यक्ष जयंत खेडकर उपस्थित होते. 

टॅग्स :Raman Science Centreरमण विज्ञान केंद्रnagpurनागपूर