लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सेवानिवृत्त पोलीस महासंचालक (डीजीपी) प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या घरातून चोरी झालेले दागिने सापडले. चक्रवर्ती यांनी चोरी गेलेले ६० हजार रुपये किमतीचे दागिने घरातच सापडल्याची माहिती सीताबर्डी पोलिसांना दिली. यामुळे काम सोडून पश्चिम बंगालला जाणाऱ्या नोकराला शोधण्यासाठी रवाना झालेल्या पोलिसांना परत यावे लागले.सीताबर्डी पोलिसांनी चक्रवर्ती यांच्या तक्रारीवरून १३ जानेवारी रोजी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या घरात चार कर्मचारी होते. दोन स्थानिक तर दोघे पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहेत. पश्चिम बंगाल येथील कर्मचारी चक्रवर्ती यांच्या घरातच राहात होते. दोघांचेही तिसºया आणि चौथ्या माळ्यावरील देवालयात येणे-जाणे होते. दीपक दास नावाचा कर्मचारी ६ जानेवारी रोजी काम सोडून गावाला परत गेला होता. १३ जानेवारीला देवालयातून दागिने चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली. तेव्हापासून दीपक दासवर संशय व्यक्त केला जात होता. सीताबर्डी पोलिसांची एक चमू पश्चिम बंगालला पाठविण्यातही आली होती.सीताबर्डी पोलिसांनी बुधवारी सकाळी दीपक दासशी संपर्क केला. त्याने चोरी केल्याची बाब नाकारली. तो पोलिसांना मदत करण्यासाठी नागपूरला येण्यासाठी तयारही झाला होता. यादरम्यान बुधवारी दुपारी चक्रवर्ती यांना चौथ्या माळ्यावर एका पिशवीत दागिने सपडल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दागिने एका पिशवीत ठेवले होते. परंतु हे दागिने नकळत तिथे ठेवले की कुणी तरी ते गायब केले होते, हे स्पष्ट होऊ शकले नाही.
अहो चोरी झालीच नाही ! सेवानिवृत्त पोलीस महासंचालकांच्या घरातच सापडले दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:21 AM
सेवानिवृत्त पोलीस महासंचालक (डीजीपी) प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या घरातून चोरी झालेले दागिने सापडले. चक्रवर्ती यांनी चोरी गेलेले ६० हजार रुपये किमतीचे दागिने घरातच सापडल्याची माहिती सीताबर्डी पोलिसांना दिली. यामुळे काम सोडून पश्चिम बंगालला जाणाऱ्या नोकराला शोधण्यासाठी रवाना झालेल्या पोलिसांना परत यावे लागले.
ठळक मुद्देसंशयित नोकराला शोधण्यासाठी रवाना झालेले पोलीस परतले