शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

अबब ! नागपुरात १०३ कोटींची थकीत पाणीपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 10:53 PM

उपराजधानीत थकीत पाणीपट्टीच्या रकमेचा आकडा शंभर कोटींहून अधिक झाला आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार शहरातील १ लाख ९० हजारांहून अधिक ग्राहकांकडे थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.

ठळक मुद्दे१ लाख ९० हजारांहून अधिक ग्राहकांकडे थकबाकी : २३ महिन्यांत ८ हजार जोडण्या कापल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत थकीत पाणीपट्टीच्या रकमेचा आकडा शंभर कोटींहून अधिक झाला आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार शहरातील १ लाख ९० हजारांहून अधिक ग्राहकांकडे थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर या माहितीच्या अधिकारात नागपूर महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत मनपाने किती ग्राहकांना पाण्याचे देयक पाठविले, किती ग्राहकांनी देयक भरले, थकबाकीची रक्कम नेमकी किती होती, तसेच किती ग्राहकांच्या जोडण्या कापण्यात आल्या इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. जलप्रदाय विभागाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत २६ लाख ४४ हजार १०१ पाणी देयक जारी करण्यात आले. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी शहरात पाण्याचे ३ लाख ३६ हजार ७५१ ग्राहक होते. यापैकी १ लाख ९० हजार ५८३ ग्राहकांकडे कमी-अधिक प्रमाणात देयकांची रक्कम थकीत आहे. थकबाकीची एकूण रक्कम ही १०३ कोटी ८८ लाख ४ हजार ४३५ इतकी आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासनातर्फे नेमके काय प्रयत्न करण्यात येत आहेत हा प्रश्नच आहे.केवळ ४ टक्के थकबाकीदारांवर कारवाईदरम्यान, या २३ महिन्यांच्या कालावधीत थकबाकीदार असलेल्यांपैकी केवळ ४ टक्के ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. ८ हजार ३७८ ग्राहकांच्या नळ जोडण्या कापण्यात आल्या. या कालावधीत ३५ हजार ७१० नवीन जोडण्यादेखील देण्यात आल्या. तर नादुरुस्त मीटरसंदर्भात केवळ १८८ तक्रारी प्राप्त झाल्या.

टॅग्स :WaterपाणीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका