शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

नागपुरात चलनातून बाद झालेले ९८ लाख जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 9:31 AM

यवतमाळच्या एका कथित फायनान्सर आणि लॉन संचालकासह पाच आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून त्यांच्याकडून चलनातून बाद करण्यात आलेल्या ९८ लाखांच्या नोटा तसेच पिस्तूल जप्त केले.

ठळक मुद्देपिस्तूलही सापडलेयवतमाळच्या लॉन संचालकासह पाच गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यवतमाळच्या एका कथित फायनान्सर आणि लॉन संचालकासह पाच आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून त्यांच्याकडून चलनातून बाद करण्यात आलेल्या ९८ लाखांच्या नोटा तसेच पिस्तूल जप्त केले. आरोपींमध्ये चंद्रपूर तसेच छत्तीसगडमधीलही आरोपींचा समावेश आहे.रहाटे कॉलनी परिसरात एक टोळी मोठ्या प्रमाणात रोकड अदलाबदल करण्याच्या तयारीत असल्याची टीप गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून शनिवारी सायंकाळी पोलिसांनी सापळा रचून रहाटे कॉलनीतील उज्ज्वल अपार्टमेंट (प्लॉट २०२) जवळ छापा घातला. पोलिसांनी तेथे संतोष जयवंतराव कदम (वय ३६, रा. संभाजीनगर, यवतमाळ), राजेश देवीदास चांडक (वय २५, रा. इमामवाडा) दीप महानगू मार्शल (वय ३५, रा. अनंतनगर), राधेलाल बेनीराम लिल्हारे (वय २७, रा. खैरी कुमरी, बालाघाट, छत्तीसगड) आणि संतोष लक्ष्मीकांत कैकरयार (वय ३८, रा. भद्रावती, चंद्रपूर) या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता पोलिसांना त्यांच्याकडे चलनातून बाद करण्यात आलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या एकूण ९८ लाखांच्या नोटा, एक पिस्तूल, दोन जिवंत काडतूस तसेच रोख ९६० रुपये आढळले. पोलिसांनी ते जप्त केले.त्यांची प्राथमिक चौकशी केली असता यवतमाळचा संतोष कदम हा या टोळीचा म्होरक्या असल्याचे स्पष्ट झाले. संतोषचे यवतमाळात लॉन असल्याचे आणि त्याने अनेक वित्तीय संस्था तसेच खासगी व्यक्तींकडून लाखोंचे कर्ज घेतले. तो स्वत:ची ओळख फायनान्सर म्हणून सांगत होता. त्याने अनेकांना चेक दिले. ते बाऊंस झाल्यामुळे त्याच्यामागे कर्जदाराचा तगादा असल्याने त्याने यवतमाळ सोडल्याचेही चौकशीत पुढे झाले.नोट अदलाबदल की ...?सद्यस्थितीत कोणतेही मोल नसलेल्या ९८ लाखांच्या जुन्या नोटा संतोष आणि त्याच्या साथीदारांजवळ आढळल्या. त्यामुळे तो आणि साथीदार नोटा अदलाबदलीच्या गोरखधंद्यात सहभागी असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे, आरोपींमध्ये त्याच्यासह नागपूर, चंद्रपूर आणि बालाघाटमधीलही आरोपींचा समावेश असल्याने नोटा अदलाबदलीच्या गोरखधंद्याचा संशय घट्ट झाला आहे. मात्र, आता त्या नोटा कुणी स्वीकारत नसल्याने त्याने अनेक महिन्यांपूर्वीच त्या जमवून ठेवल्या आणि आता त्या बदलवून घेण्यासाठी ग्राहक शोधत असावा, असाही संशय आहे. दुसरे म्हणजे, या टोळीने एखाद ठिकाणी लुटमार केली असावी त्यात या जुन्या नोटा त्यांच्या हाती लागल्या असाव्या, असाही संशय आहे.लुटमारीच्या होते तयारीआरोपींजवळ पिस्तुलासह दोन जिवंत काडतूसही सापडले. त्यामुळे ते मोठी लुटमार करण्याच्या तयारीत असावे, असाही पोलिसांना संशय आहे. पिस्तुलासंदर्भात आरोपीने ते आपल्याला लॉनमध्ये सापडल्याची बतावणी पोलिसांकडे केली आहे. मात्र, त्याचे हे कथन बनवाबनवीचा प्रकार असल्याचे पोलिसांचे मत आहे. दरम्यान, या टोळीतील आरोपींना कोर्टात हजर करून पोलिसांनी रविवारी त्यांचा २८ फेब्रुवारीपर्यंत पीसीआर मिळवला. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक गोरख कुंभार, प्रशांत चौगुले, संजय चव्हाण, उपनिरीक्षक श्रीनिवास मिश्रा, हवालदार अफसर खान, रमेश उमाटे, नरेश रेवतकर, नरेश सहारे, अमित पात्रे, आशिष ठाकरे, रवींद्र बारई, राहुल इंगोले, मंगेश मड़ावी, आशीष देवारे, राजेंद्र सेंगर, देवीप्रसाद दुबे, अविनाश तायड़े आणि नीलेश वाड़ेकर यांनी ही कामगिरी बजावली.

 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकCrimeगुन्हा