- वसंत पुरके : ‘रामायणातील महिला’च्या लेखिकांचा सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगातील सर्वात कृतज्ञ हा माणूस आहे तर कृतघ्न प्राणी म्हणूनही माणसाचीच ओळख आहे. प्राचिन काळात महिलांनी सोसले आहे आणि त्यांच्यामुळेच समन्वयही राहिला आहे; मात्र वर्तमानात महिलांनी सहिष्णूतेचा हा प्राचिन भाव सोडणे गरजेचे असल्याची भावना माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी आज येथे व्यक्त केली.
रत्ना कम्युनिकेशन्सच्यावतीने स्मिता स्मृती विशेषांक २०२०, ‘रामायणातील महिला’ या पुस्तकाचे प्रकाशन व लेखिकांचा सत्कार कार्यक्रम शंकर नगर येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात पार पडला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून पुरके बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक मधुकर भावे, गिरीश गांधी व डॉ. शोभा भगांधी उपस्थित होते.
रामायण, महाभारत या महाकाव्यांचा अभ्यास सत्य-असत्यतेच्या दूर जाऊन मूल्यांच्या आधारे केला जावा, अशी अपेक्षाही पुरके यांनी यावेळी व्यक्त केली.
रामायणाने तत्कालिन काळातील समाजात मोठा आत्मविश्वास निर्माण केला; मात्र त्या काळात विसंगतीही मोठ्या प्रमाणात दिसून आल्याचे मत मधुकर भावे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी डॉ. लिना रस्तोगी, डॉ. प्रज्ञा आपटे, डॉ. प्रतिमा इंगोले, डॉ. कविता होले, डॉ. नंदा पुरी, डॉ. भारती सुदामे, डॉ. रत्नप्रभा अंजनगावकर, डॉ. आशा आंबोरे, आशा पांडे, शुभांगी भडभडे, प्रतिभा कुळकर्णी, डॉ. स्मिता होटे, डॉ. मृदृला नासेरी, डॉ. पद्मरेखा धनकर, नम्रता गांधी या महिला लेखिकांचा सत्कार करण्यात आला. संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी केले.
..................