नागपूर : दशरथ जयराम गाटकिने या ७५ वर्षांच्या वृद्धाने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली. ६ मे रोजी त्यांनी स्वतःला जाळून घेतल्यानंतर त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवारी रात्री डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
---
अपघातात जखमीचा मृत्यू
नागपूर : ७ मे रोजी सायंकाळी अपघातात जखमी झालेल्या विकी जयदेव उईके (वय २५, रा. प्रतापनगर) या तरुणाचा मेडिकलमध्ये उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीवरून बेलतरोडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
---
गिट्टीखदानमध्ये घरफोडी
नागपूर : गव्हर्नमेंट कॉलनी दाभा येथे राहणारे उदारामजी नथूजी आसोले यांच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे बिस्कीट तसेच २७ हजार रुपये रोख, असा एक लाख ७० हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
गुरुवारी सकाळी ६ वाजता ही घटना उघडकीस आली. आसोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
---