नागपुरात काँग्रेसच्या तिकिटासाठी जुन्यांसह नवखेही मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 11:41 PM2019-07-06T23:41:13+5:302019-07-06T23:42:13+5:30

गेल्या विधानसभेत नागपूर शहराच्या सहाही विधानसभेत काँग्रेसचा झालेला दारुण पराभव, महापालिकेच्या निवडणुकीत झालेले पानिपत व नुकतेच लोकसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशानंतरही काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये विधानसभा निवडणूक लढण्यासाठी उत्साह दिसून येत आहे. तिकीट मिळविण्यासाठी जुन्यांसह नवखेही मैदानात उतरले आहेत. सहाही विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे ५० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत.

Old with new in ring for congress ticket in Nagpur | नागपुरात काँग्रेसच्या तिकिटासाठी जुन्यांसह नवखेही मैदानात

नागपुरात काँग्रेसच्या तिकिटासाठी जुन्यांसह नवखेही मैदानात

Next
ठळक मुद्देपराभवानंतरही इच्छुकांमध्ये उत्साह : सहा मतदारसंघासाठी सुमारे ५० जणांचे अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या विधानसभेत नागपूर शहराच्या सहाही विधानसभेत काँग्रेसचा झालेला दारुण पराभव, महापालिकेच्या निवडणुकीत झालेले पानिपत व नुकतेच लोकसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशानंतरही काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये विधानसभानिवडणूक लढण्यासाठी उत्साह दिसून येत आहे. तिकीट मिळविण्यासाठी जुन्यांसह नवखेही मैदानात उतरले आहेत. सहाही विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे ५० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत.
प्रदेश काँग्रेस कमिटीने विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना देवडिया कॉग्रेस भवनातून ५ जुलैपर्यंत उमेदवारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. संबंधित अर्ज आवश्यक दस्तावेज व १५ हजार रुपये शुल्कासह प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुंबई येथील कार्यालयात जमा करायचे आहेत. नागपुरात काँग्रेसचा सातत्याने पराभव होत असताना विधानसभा निवडणुकीसाठी फारसे कुणी इच्छुक असणार नाहीत, अशी शक्यता वाटत होती. मात्र, जय- पराजयाची पर्वा न करता काँग्रेसमधील इच्छुक कंबर कसून तिकीट मिळविण्यासाठी मैदानात उतरले आहेत. प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची गर्दी आहे.
दक्षिण- पश्चिम नागपूरसाठी ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, कुमार बोरकुटे, उमेश शाहू, गणेश कश्यप, डॉ.गजराज हटेवार यांनी अर्ज घेतले आहेत.
दक्षिण नागपूरसाठी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, नरेद्र दिवटे, मोरेश्वर ऊर्फ मनोज सांबळे, नितीन कुंभलकर इच्छुक आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला पूर्व नागपुरातून सर्वाधिक लीड मिळाला होता. येथून गेल्यावेळी विधानसभा लढलेले अ‍ॅड.अभिजित वंजारी यांच्यासह प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री, माजी महापौर नरेश गावंडे, नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांनीही यावेळी अर्ज घेतले आहेत. मध्य नागपूरसाठी इच्छुकांची मोठी रांग आहे. नगरसेवक रमेश पुणेकर, मोतीराम मोहाडीकर, नंदा पराते, राजेद्र नंदनवार, प्रा.दिनेश बानाबाकोडे, माजी आमदार यशवंत बाजीराव, मोरेश्वर ऊर्फ मनोज साबळे, आसीफ कुरैशी, अब्दुल शारिक पटेल, रमण पैगवार, शेख हुसैन, राजेश गिरींपुजे(महाजन), अमान उल्ला खान, रमण ठवकर, श्रीकांत ढोलके, नफीसा सिराज अहमद, तौषिक अहमद अब्दुल वसीफ यांनी अर्ज घेत दावेदारी सादर केली आहे.
ठाकरे व राऊत यांनी अर्जच घेतले नाही
 पश्चिम नागपूर मतदारसंघातून गेल्यावेळी लढलेले काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी मात्र यावेळी उमेदवारीसाठी देवडियातून अर्ज घेतलेला नाही. नगरसेवक हरीश ग्वालबंशी, नितीश ग्वालबंशी, प्रमोद नरड, शादब खान नायडू, संदेश सिंगलकर, मोहम्मद वसीम यांनी मात्र अर्ज घेतले आहेत. एनएसयूआयचे प्रदेश उपाध्यक्ष अभिषेक वर्धन आशुतोष सिंह यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्याप्रकारे उत्तर नागपूरसाठी माजी मंत्री नितीन राऊत यांनीही अर्ज घेतलेला नाही. येथे किशोर गजभिये, नगरसेवक संदीप सहारे, प्रमोद चिंचखेडे, बंडोपंत टेंभुर्णे, महेद्र बोरकर, मनोज सांगोळे, धरम पाटील, राकेश निकोसे, भावना लोणारे, किशोर दहीवाले यांनी अर्ज घेतले आहेत.

Web Title: Old with new in ring for congress ticket in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.