लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भावाच्या मृत्यूमुळे दु:खी झालेल्या एका वृद्ध महिलेचा रडत असताना मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना मंगळवारी अजनीच्या काशीनगरात घडली.अंतकला संपत देशपांडे (७०) रा. नवजीवन कॉलनी असे वृद्ध महिलेचे नाव आहे. अंतकला यांचा मोठा भाऊ रामा मेश्राम अजनीच्या काशीनगरात राहतो. रामा मेश्राम रेल्वेतून सेवानिवृत्त झाला होता तो १० वर्षांपासून पक्षाघाताचा रुग्ण होते. मंगळवारी सकाळी रामा यांचा मृत्यू झाला. त्यांना अंतकलासह चार बहिणी होत्या. रामा यांच्या अंत्यसंस्कारासाठी अंतकला कुटुंबीयांसह भावाच्या घरी आल्या होत्या. एकुलत्या एका भावाचा मृत्यू झाल्यामुळे अंतकला यांना खूप दु:ख झाले. सकाळी १०.३० वाजता अंतकला भावाच्या मृत्यूमुळे रडत होत्या. दरम्यान अचानक त्यांना भोवळ आली आणि त्या खाली कोसळल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी मेडिकलला पोहोचविले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. भावासोबत बहिणीचाही मृत्यू झाल्यामुळे मेश्राम आणि देशपांडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रामाजी यांच्यावर मानेवाडा घाटावर तर अंतकला यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भावाच्या निधनामुळे दु:खी वृद्ध महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 11:32 PM
भावाच्या मृत्यूमुळे दु:खी झालेल्या एका वृद्ध महिलेचा रडत असताना मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना मंगळवारी अजनीच्या काशीनगरात घडली.
ठळक मुद्देअंत्यसंस्कारात आली भोवळ : मेडिकलमध्ये केले मृत घोषित