नागपूर : वृद्ध वडिलांना वाऱ्यावर सोडू पाहणाऱ्या मुलावर प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नितीन बद्रीप्रसाद शहा (वय ४८) असे आरोपी मुलाचे नाव आहे. बद्रीप्रसाद गंगाभूषण शहा (वय ७८) हे आयुध निर्माणीतील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांना २० हजार रुपये निवृत्तीवेतन मिळते. त्यांना चार मुले असून, त्यातील एक विदेशात उच्चपदावर कार्यरत आहे. इतर तीन मुले नागपुरात राहतात. त्यातील एक मनीषनगरात तर नितीन आणि अन्य एक प्रतापनगरातील गुडधे लेआऊटमधील प्रशस्त निवासस्थानी राहतात. नितीन लॅण्डस्केपिंगचे कंत्राटदार आहेत. १५ ते १७ वर्षांपासून वडिलांचा ते सांभाळ करीत आहेत. याच घरात राहणारा त्यांचा दुसरा भाऊ खासगी नोकरी करतो. तर, मनीषनगरातील भाऊ एलआयसीत आहे. सुखवस्तू अशा या कुटुंबातील वडिलांचा सर्वच भावांनी सांभाळ करावा, अशी नितीनची भूमिका आहे. ताठर भूमिका ठाणेदार शिवाजी गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सुखवस्तू कुटुंबातील वादाचा आपसी समेट घडावा, म्हणून बरेच प्रयत्न केले. मात्र, दोन्हीकडून आपलीच बाजू बरोबर असल्याची भूमिका घेण्यात आल्याने शेवटी पीएसआय निशा बनसोड यांनी नितीन शहा यांच्याविरुद्ध वृद्ध वडिलांना वाऱ्यावर सोडण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
वृद्ध वडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्यावर गुन्हा दाखल
By admin | Published: September 13, 2016 2:44 AM