उच्च न्यायालयात ओमायक्रॉनची भीती; नाताळाच्या सुट्यानंतर नियमित कामकाजाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 09:48 PM2022-01-03T21:48:43+5:302022-01-03T21:49:14+5:30
Nagpur News नाताळाच्या सुट्या संपल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये सोमवारपासून नियमित कामकाजाला सुरुवात झाली. दरम्यान, सर्वांच्या मनात ओमायक्रॉनची भीती आढळून आली.
नागपूर : नाताळाच्या सुट्या संपल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये सोमवारपासून नियमित कामकाजाला सुरुवात झाली. दरम्यान, सर्वांच्या मनात ओमायक्रॉनची भीती आढळून आली.
ओमायक्रॉन वाढत असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पुढील दोन आठवडे केवळ ऑनलाईन कामकाज करण्याचे जाहीर केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्यपीठातही मंगळवारपासून पुढील आदेशापर्यंत ऑनलाईन व फिजीकल अशा मिश्र पद्धतीने कामकाज होणार आहे. परिणामी, नागपूर खंडपीठातील वकिलांमध्ये दिवसभर ओमायक्रॉनचीच चर्चा व भीती होती. नागपूर खंडपीठातील कामकाज ऑनलाईन होईल की फिजीकल कायम राहील, यावर प्रत्येकजण विचारमंथन करीत होते. यापूर्वी कोरोना वाढला असताना नागपूर खंडपीठातील कामकाज अनेक महिने केवळ ऑनलाईन पद्धतीने झाले. या काळात अनेकांना विविध तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. भूतकाळातील कटू अनुभवांमुळे सर्वजण परिस्थिती सुधारण्याची प्रार्थना करीत आहेत.