शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

महारॅलीसाठी काँग्रेस नेत्यांची ‘वज्रमूठ’; युवक काँग्रेसची शहरात बाइक रॅली, नेत्यांनी केली सभास्थळाची

By जितेंद्र ढवळे | Published: December 26, 2023 10:11 PM

पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सभास्थळाची पाहणी करीत आवश्यक त्या सूचना दिल्या.

नागपूर : काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त २८ डिसेंबर रोजी नागपुरात ‘है तयार हम’ ही महारॅली होत आहे. बहादुरा येथील ‘भारत जोडो मैदाना’वर होणाऱ्या या रॅलीच्या दमदार आयोजनासाठी काँग्रेस नेत्यांनी ताकद लावली आहे. मंगळवारी युवक काँग्रेसने बाइक रॅली काढून महारॅलीसाठी शहरात जागर केला. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सभास्थळाची पाहणी करीत आवश्यक त्या सूचना दिल्या.

तत्पूर्वी राधिकाताई पांडव अभियांत्रिकी महाविद्यालयात काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. तीत विविध समित्या जाहीर करीत सभेच्या आयोजनासंदर्भात जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. उपरोक्त वरिष्ठ नेत्यांसह माजी मंत्री विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आ. राजू पारवे, गिरीश पांडव यांच्यासह विदर्भातील प्रमुख नेते उपस्थित होते.

‘भारत जोडो बाइक’ रॅलीने लक्ष वेधले२८ डिसेंबर रोजी होणाऱ्या महारॅलीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस कार्यसमितीचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी शहरात ‘भारत जोडो’ बाइक रॅली काढण्यात आली. तीत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश प्रभारी उदयभानू चिब, राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके, राष्ट्रीय सचिव अजित सिंह, एहसान खान, आतिशा पैठनकर, शिवराज मोरे, श्रीनिवासन नालंवार, मिथिलेश कन्हेरे, तौसीफ खान, आसिफ शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संघभूमीतून भाजपला उत्तर देणार : चव्हाणकेंद्रातील भाजप सरकार बेरोजगारी, महागाई तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरले आहे. संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातून काँग्रेस भाजपला चोख उत्तर देणार असल्याचे काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

सत्ता परिवर्तनाचा बिगुल फुंकणार : वडेट्टीवारविजय वडेट्टीवार यांनीही सभास्थळी दाखल होत तयारीचा आढावा घेतला. विदर्भातील जनतेने काँग्रेसला नेहमीच साथ दिली आहे. महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेस देशात सत्ता परिवर्तनाचा बिगुल फुंकणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

‘वंचित’साठीही तयारमहारॅलीपूर्वी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. ‘वंचित’ला इंडिया आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत अशोक चव्हाण यांनीही सकारात्मकता दर्शविली. यासंदर्भात दिल्ली येथे दि. २९ रोजी होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

विविध समित्यांची स्थापनामहारॅलीच्या यशस्वीतेसाठी काँग्रेसने विविध समित्यांची स्थापना केली. यात ७५ सदस्यांच्या आयोजन समितीचाही समावेश आहे. यात राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, अविनाश पांडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोध पक्षनेते विजय वडट्टीवार, आजी-माजी खासदार आणि आमदारांचा समावेश आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर