आगार / कोरोनापूर्वी मुक्कामी थांबणाऱ्या बसेस / सध्या मुक्कामी थांबणाऱ्या बसेस
१) गणेशपेठ २८/ २६
२) घाट रोड २३ /१९
३) इमामवाडा १२/ १४
४) वर्धमाननगर १३/ ८
५) रामटेक २४ /१२
६) सावनेर २२/ २०
७) उमरेड २८ /१९
८) काटोल ३०/ २१
....................................................................................
एकूण १८० १३९
अर्ध्या बसेस आगारातच
-कोरोनामुळे दुपारी चारपर्यंत बाहेर जाण्याचे निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवासी सहसा घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे एसटीची वाहतूक पूर्णपणे सुरू झालेली नाही. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात एकूण ४३० बसेस आहेत. यापैकी केवळ २८१ बसेस मार्गावर धावत आहेत. पूर्वी १६०० फेऱ्यांच्या माध्यमातून १ लाख ६४ हजार किलोमीटरचा प्रवास बसेस पूर्ण करीत होत्या. परंतु आता केवळ ९०५ फेऱ्यांच्या माध्यमातून ९३ हजार ४०० किलोमीटर पूर्ण होत आहेत. यात एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाचे उत्पन्नही ४८ लाखांवरून २३ लाखांवर आले आहे.
सकाळीच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय
‘मागील २० वर्षांपासून पारडी गावात एसटी बस मुक्कामी येत होती. परंतु मागील दीड वर्षांपासून ही बस बंद झाली आहे. सकाळीच गावातील अनेक नागरिकांना कामानिमित्त बाहेरगावी जावे लागते. परंतु बसच येत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.’
-नरेश शुक्ला, प्रवासी पारडी,
खासगी वाहनाने करावा लागत आहे प्रवास
‘अनेक नागरिक कामानिमित्त कामठी, कुही, कळमना मार्केट, नागपूरला जात होते. मागील १० वर्षांपासून गावात मुक्कामी बस यायची. दीड वर्षांपासून बस मुक्कामी येणे बंद झाले. त्यामुळे नाईलाजास्तव प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी गावात मुक्कामी बस थांबणे आवश्यक आहे.’
-दिलीप जिवतोडे, प्रवासी मुसळगाव
शाळा सुरू होताच नाईट आऊट बसेस सुरू करू
‘सध्या विद्यार्थी फेऱ्या बंद आहेत. शाळा, महाविद्यालये पूर्णपणे सुरू झालेली नाहीत. ती सुरू होताच नाईट आऊट बसेस सुरू करण्यात येतील.
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग
............