-लोकमत Explained
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन वापरासाठी ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ची ‘कोविशिल्ड’ लसीला परवानगी मिळली आहे. या लसीची मानवी चाचणी नागपूरच्या मेडिकलमध्ये सुरू असून ५० स्वयंसेवकांना पहिला आणि दुसरा डोज देण्यात आला आहे. सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामुळे लसीला घेऊन सामान्यामध्ये उत्साह आहे. दुसरीकडे आरोग्य विभागाने लसीकरणाची तयारी पूर्ण केली आहे. शनिवारी याची रंगीत तालिम, ‘ड्राय रन’ होणार आहे. मानवी अस्तित्वालाच आव्हान दिलेल्या कोरोना विषाणूवर या प्रतिबंधक लसीने आशेचे किरण दाखविला आहे.
-ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधन
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधावर ''''''ऑक्सफर्ड विद्यापीठा''''''''तील संशोधकांनी जी लस निर्माण केली तिची पुण्याच्या हडपसर इथल्या ''''''''सिरम इन्स्टिट्यूट''''''''मध्ये निर्मिती होत आहे.
-२५० दशलक्ष लसीचे डोज
''''''''सिरम इन्स्टिट्यूट''''''''चे सीईओ आदार पूनावाला यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनुसार, या वर्षाअखेर पर्यंत जवळपास २५० दशलक्ष डोजेस तयार करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. ५ ते १० दशलक्ष डोजेस प्रत्येक महिन्याला बनवायला सुरुवात केली आहे.
-पहिल्यांदाच एवढ्या वेगाने मानवी चाचणी
कुठल्याही प्रतिबंधक लसीच्या चाचणीसाठी वर्षानुवर्षे लागतात. परंतु कोरोनाचा धोका लक्षात घेऊन इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या वेगाने तयार झालेली ही पहिलीच लस आहे. लसनिर्मितीचा या कमी कालावधीवर काही वैद्यकीय तज्ज्ञानी बोट ठेवले आहे.
-जगभरात मानवी चाचणी
युकेमध्ये १० हजार, ब्राझिलमध्ये ४ हजार, दक्षिण आफिक्रेत २ हजार, अमेरिकेत ३० हजार तर भारतात १६०० स्वयंसेवकावर कोविशिल्ड लसीची मानवी चाचणी निष्कर्षाच्या टप्प्यात पोहचली आहे.
-दोन भागात घ्यावी लागणार लस
कोविशिल्ड लसीचा पहिला डोज घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा ''''''''बूस्टर डोस'''''''' घ्यावा लागणार आहे.
-नागपुरात मानवी चाचणीत २० महिला, २५ तरुण तर ५ ज्येष्ठांचा समावेश
‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मार्फत ‘आॉक्सफर्ड युनिव्हर्सिटी’, ‘अॅस्टॅजेनका’ कंपनीकडून‘कोविशिल्ड’ लसीच्या जगभरात चाचण्या घेतल्या जात आहेत. २३ नोव्हेंबरपासून नागपूरच्या मेडिकलमध्ये पल्मनरी मेडिसीनचे विभाग प्रमुख व ‘कोविशिल्ड’ चाचणीचे प्रमुख अन्वेषक डॉ. सुशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. यात १८ ते ७० वयोगटातील ५० स्वयंसेवकांमध्ये २० महिला, २५ पुरुष व ६० वर्षांवरील ५ ज्येष्ठ नागरिक आहेत.
-नागपुरात पहिल्या टप्प्यात ३१ हजार हेल्थ वर्करना लस
कोविशिल्ड लसीकरणाला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याचे संकेत आहे. नागपुरात पहिल्या टप्प्यात ३१ हजार हेल्थ वर्करना लस दिली जाणार आहे.
-लस सुरक्षित
एखाद्या लसीचे संशोधन पूर्ण होऊन, तिचा प्राण्यांवर आणि नंतर मानवी चाचणी केली जाते. भारतात तीन टप्प्यात मानवी चाचणीतून हजारो स्वयंसेवकाना लस देण्यात आली. याचा अंतिम निष्कर्ष येऊन आणि नंतर ती दिली जाणार आहे. यामुळे लस सुरक्षित असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.