लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित रुग्णांच्या रोजच्या निघणाऱ्या कचऱ्यात मोठी वाढ झाली आहे. पूर्वी साधारण ५०० ते ७०० किलोग्रॅम रोजचा कचरा निघायचा, आता तो वाढून १२०० ते १५०० किलोग्रॅमवर पोहचला आहे. वाढत्या बायोमेडिकल वेस्टमुळे एक आव्हान निर्माण झाले आहे. धक्कादायक म्हणजे, कोविड पॉझिटिव्ह असलेले अडीच हजारावर रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. यांचा कचरा मनपाच्या कचऱ्यात जात असल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे.नागपूर जिल्ह्यात जून महिन्यात दिवसाला २० ते ५० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद व्हायची. जुलै महिन्यात ही संख्या वाढून ५० ते १०० वर गेली. आता ती ५०० ते १००० रुग्णसंख्येच्या दरम्यान गेली आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच यांच्या कचऱ्यातही वाढ झाली आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्णाच्या वेगवेगळ्या शस्त्रक्रियेनंतर निकामी झालेले शरीरातील अवयव किंवा ट्युमर, इंजेक्शन, आयव्ही बॉटल, प्लास्टर, कापूस, बॅण्डेज, सिरिंज, पेशंटशी संपर्कात आलेल्या आणि उपचार करताना वापरलेली प्रत्येक वस्तू ‘बायोमेडिकल वेस्ट’मध्ये मोडते. यात सर्वाधिक कचरा हा पीपीई किट, मास्क व हॅण्ड ग्लोव्हजचा आहे. आरोग्य जपणे व पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी या कचऱ्याचे व्यवस्थापन निकोप होण्याच्या दृष्टीने ‘बायो-मेडिकल वेस्ट हॅण्डलिंग रुल्स’चे कठोरतेने पालन करणे अत्यंत आवश्यक असते. महानगरपालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे याकडे लक्ष असते. या कचऱ्याची उचल व विघटन करण्याची जबाबदारी ‘सुपर हायजेनिक डिस्पोजल कंपनीकडे आहे. कंपनीनुसार जून महिन्यापर्यंत शासकीय रुग्णालय, जसे मेयो, मेडिकलमधून कोरोनाबाधित रुग्णांशी संबंधित रोजचे बायोमेडिकल वेस्ट १०० ते १५० किलोग्रॅम निघायचे, ते आता दुपटीने वाढले आहे. रोज २०० ते २५० किलोग्रॅम कचरा निघत आहे. यातच आता सहा खासगी हॉस्पिटलमधील कोविड हॉस्पिटल व सात कोविड केअर सेंटरची भर पडल्याने संपूर्ण कोविड रुग्णांचा हा कचरा १२०० ते १५०० वर पोहचला आहे.१२०० डिग्री तापमानात केली जाते विल्हेवाट‘सुपर हायजेनिक डिस्पोजल कंपनीचे भांडेवाडी डम्पिंग स्टेशन येथे एक केंद्र आहे. येथे हॉस्पिटलमधून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या कचऱ्याचे संकलन केले जाते. विशिष्ट यंत्राच्या माध्यमातून १२०० डिग्री तापमानात या कचºयाची विल्हेवाट लावली जाते. दर तासाला १००किलो कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते.२६०८ रुग्ण होम आयसोलेशनमध्येलक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशन म्हणजे गृह विलगिकरणात ठेवले जाते. सध्या २६०८ कोविड पॉझिटिव्ह रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. यांच्या मास्कसह इतर कचरा मनपाच्या कचऱ्यात मिसळत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.नॉनकोविड रुग्णांचा दोन टन कचरानॉनकोविड रुग्णांचा मेयो, मेडिकलसह इतर खासगी हॉस्पिटलमधून रोज दोन ते अडीच टन बायोमेडिकल वेस्ट निघतो. या कचऱ्याचीही तेवढ्याच जबाबदारीने विल्हेवाट लावली जात असल्याचे ‘सुपर हायजेनिक डिस्पोजल कंपनीचे म्हणणे आहे.स्वतंत्र वाहनातून कचऱ्याची उचल‘बायो-मेडिकल वेस्ट’ची विल्हेवाट लावण्याचे कठोर नियम आहेत. त्यात कोविडच्या बायो मेडिकल वेस्टमधून संसर्ग होऊ नये यासाठी त्याचे संकलन, भांडेवाडीपर्यत त्याचा प्रवास व विघटनाकडे विशेष लक्ष दिले जाते. यासाठी तीन स्वतंत्र वाहने, प्रत्येक वाहनात पीपीई किट घातलेले कर्मचारी असतात. भांडेवाडी येथे हा कचरा यंत्राद्वारे जाळला जातो.-रबी सिंग,व्यवस्थापक, ‘सुपर हायजेनिक डिस्पोजल कंपनी