नागपूर : कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेका नाका नारी रोड भागात राहणारे मारोती रामदास लक्षणे (वय ४७) यांनी विष पिऊन आत्महत्या केली. मिळालेल्या सूचनेवरून कपिलनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
---
औषधाच्या ओवर डोसमुळे महिलेचा मृत्यू
नागपूर : जरीपटका येथील मयूर एकता को-ऑप. सोसायटीत राहणाऱ्या संघमित्रा शंकर गजभिये (वय ५२) यांनी मोठ्या प्रमाणात औषधी खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या सूचनेवरून जरीपटका पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
---
सदरमध्ये मेन्सवेअर फोडले
नागपूर : सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळवारी कॉम्प्लेक्स येथे असलेले एक रेडिमेड कपड्याचे दुकान फोडून चोरट्यांनी आतमधून जीन्स पॅन्ट, टी-शर्ट, कंबरपट्टा, परफ्युम असा एकूण ६७ हजाराचा मुद्देमाल लंपास केला.
शुक्रवारी सकाळी ८ वाजता ही घटना उघडकीस आली. शेख सैफउल्ला शेख नियामतउल्ला यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
---