पारशिवनी : सततच्या आजारपणाला कंटाळून एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील तामसवाडी शिवारात शनिवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास घडली.
कुमार अखाडू गाेमकाळे (६२, रा. तामसवाडी, ता. पारशिवनी) असे मृताचे नाव आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे ताे आपल्या शेतात एकटा गेला हाेता. दरम्यान शेतातील झाडाला दाेरीने गळफास लावून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. शेजारच्या शेतकऱ्यास ताे झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती गावात पसरली. याबाबत गावकऱ्यांनी पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. सततचे आजारपण आणि आर्थिक चणचण यामुळे ताे त्रस्त हाेता, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.