केळवद : दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकीस्वार राेडवर पडला. अशात मागून येणाऱ्या अज्ञात भरधाव दुचाकीस्वाराने त्यास जबर धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना केळवद पाेलीस ठाण्यांतर्गतच्या टाेलनाकाजवळ रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
प्रकाश उर्फ प्रवीण रमेश बावणे (३३, रा.कळंबी, ता.कळमेश्वर) असे मृताचे नाव आहे. प्रकाश बावणे हा आपल्या एमएच-४०/एझेड-९५२८ क्रमांकाच्या ॲक्टिव्हा दुचाकीने मध्य प्रदेश साैंसरकडून सावनेरकडे जात हाेता. दरम्यान, केळवदनजीकच्या टाेल नाक्याजवळ दुचाकीवरील ताबा सुटल्याने ताे राेडवर पडला. अशातच मागून भरधाव येणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वाराने त्यास जाेरात धडक दिली. त्यात प्रकाश गंभीररीत्या जखमी झाला. लागलीच त्याला सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तपासणीअंती डाॅक्टरांनी त्यास मृत घाेषित केले. या प्रकरणी केळवद पाेलिसांनी अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक अर्जुन राठाेड करीत आहेत.