कळमेश्वर : परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दाेन दुचाकीची धडक झाली. त्यात गंभीर जखमी झाल्याने एका दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गाेंडखैरी येथे २८ एप्रिलला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
श्रावण ज्ञानेश्वर काळे (५३, रा. गाेंडखैरी, ता. कळमेश्वर) असे मृताचे नाव आहे. श्रावण काळे हे आपल्या दुचाकीने जात असताना अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. लगेच त्यांना नागपूर मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वैभव श्रावण काळे (२२, रा. गाेंडखैरी, ता. कळमेश्वर) यांच्या तक्रारीवरून कळमेश्वर पाेलिसांनी भादंवि कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास सहायक फाैजदार सपाटे करीत आहेत.