लाेकमत न्यूज नेटवर्क
धामणा : मासेमारी करीत असताना जाेरदार पावसाला सुरुवात झाली आणि चाैघांनीही जवळच असलेल्या झाडाखाली आश्रय घेतला. त्यातच जाेरात कडाडलेली वीज थेट झाडावर काेसळली. त्यात हाेरपळलेल्या एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ नागपूर शहरातील शासकीय रुग्णालयात भरती केले आहे. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील १४ मैल परिसरातील वेणा जलाशयाच्या काठी शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.
सुरेश नारायण वर्मा (६०, रा. रा. लाल स्कूल बजेरिया, नागपूर) असे मृताचे नाव असून, जखमींमध्ये विजय गौर (५४), गुलाबसिंग वर्मा (५५) व राकेश कश्यप (५२) सर्व रा. लाल स्कूल बजेरिया, नागपूर या तिघांचा समावेश आहे. चाैघेही मित्र असून, ते शुक्रवारी दुपारी वेणा जलाशयात मासेमारी करण्यासाठी आले हाेते. त्यांनी मासेमारीला सुरुवातही केली हाेती. काही वेळात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांनी जलाशयाच्या काठी असलेल्या झाडाखाली आश्रय घेतला.
पावसाचा जाेर वाढत असतानाच जाेरात कडाडलेली वीज थेट झाडावर काेसळली. त्यात चाैघेही हाेरपळले. मात्र, सुरेश वर्मा यांचा काही वेळात घटनास्थळीच मृत्यू झाला. यातील कमी जखमी झालेल्याने या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीय व मित्रांना दिली. स्थानिक नागरिकांनी माहिती देताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी जखमींना उपचारासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्याची व्यवस्था केली तर, सुरेश वर्मा यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.
...
सूचना फलकाकडे दुर्लक्ष
या जलाशयात काही वर्षांपूर्वी सेल्फी काढताना नऊ जणांचा बुडून मृत्यू झाला हाेता. येथे मासेमारी करण्यावर बंदी घातली असताना काही हाैशी जीव धाेक्यात टाकून मासेमारी करतात. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे प्रशासनाने या जलाशयाच्या काठावर माेठे फलक लावून जलाशयात मासेमारी करणे, नाैकानयन करणे व सेल्फी काढण्यास बंदी आहे, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, हाैशी मंडळींना त्या सूचनांचे काहीही घेणे-देणे नसल्याचे दिसून येते.