--------
एकाने घेतला गळफास
नागपूर - भीवसनखोरी येथील धीरज मदन शेंडे (वय ३८) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी रात्री ही घटना घडली. बळवंत हंसराज रंगारी (वय ३८) यांनी दिलेल्या माहितीवरून गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----
करंटमुळे सक्करदऱ्यातील तरुणाचा करुण अंत
नागपूर - कुलरचा जोरदार वीजप्रवाह लागल्याने एका तरुणाचा करुण अंत झाला. सुजित सदाशिव गणवीर (वय ३२, रा. जुनी बिडीपेठ) असे मृताचे नाव आहे.
सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सुजित अंघोळ करून आला आणि त्याने कुलर सुरू केला. त्याला जोरदार विजेचा धक्का लागल्याने सुजित खाली पडला. त्याला घरच्यांनी डॉक्टरांकडे नेले असता मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीवरून सक्करदरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----