शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

दरवर्षी एक लाख बुबुळांची गरज : विकास महात्मे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 9:21 PM

देशात मृत्यूच्या एक टक्का जरी नेत्रदान झाले तरी संपूर्ण देशाची बुबुळाची गरज भागविल्या जाऊ शकते. यामुळे प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे यांनी केले.

ठळक मुद्देनेत्रदान जनजागृती रॅली रविवारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात दरवर्षी सुमारे ८० लाख लोकांचा मृत्यू होतो. मात्र यातील एक लाख लोकांचेही नेत्रदान होत नाही. यामुळे अनेकांवर अंधत्व जीवन जगण्याची वेळ येते. देशात मृत्यूच्या एक टक्का जरी नेत्रदान झाले तरी संपूर्ण देशाची बुबुळाची गरज भागविल्या जाऊ शकते. यामुळे प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे यांनी केले.महात्मे आय बँक, आय हॉस्पिटलमधील नेत्रपेढीच्यावतीने नेत्रदान पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी ‘एसएमएम आय वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ. सुनीता महात्मे, डॉ. निखिलेश वैरागडे उपस्थित होते.डॉ. महात्मे म्हणाले, मोतीबिंदू, काचबिंदू आणि वाढत्या वयामुळे बुबुळाचे अंधत्व वाढत आहे. भारतात याचे प्रमाण १५.४ टक्के आहे. बुबुळ प्रत्यारोपण हाच एकमेव यावर उपचार आहे. यासाठी नेत्रदान होणे गरजेचे आहे. नेत्रदानाचा टक्का वाढविण्यास नेत्रपेढीचा मोलाचा वाटा असतो. गेल्या पाच वर्षात महात्मे आय हॉस्पिटलने ३०० हून अधिक लोकांमध्ये बुबुळ प्रत्यारोपण करून नवी दृष्टी दिली. एका प्रश्नाला उत्तर देताना खा. डॉ. महात्मे म्हणाले, मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मोहीम चांगल्या गतीने सुरू आहे. यात शासनाचा निधी वाढवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.डॉ. सुनीता महात्मे म्हणाल्या, नेत्रदानाचा संदेश लोकांपर्यंत पोहचण्यासाठी रविवार १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली महात्मे आय बँक येथून सुरू होऊन जयप्रकाशनगर, सोमलवाडा होत संस्थेच्या आवारात समारोप होईल. रॅलीत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. डॉ. वैरागडे म्हणाले, नेत्रदानाला वय, लिंग, रक्तगटाचे बंधन नाही. फार कमी अपवाद वगळता कुणीही नेत्रदान करू शकते. नेत्रदानाविषयी गैरसमज दूर व्हायला हवेत, असेही ते म्हणाले. या प्रसंगी नेत्रदानासाठी पुढाकार घेणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

 

टॅग्स :Vikas Mahatmeविकास महात्मेOrgan donationअवयव दान