- मंगेश व्यवहारेनागपूर : अण्णसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजातील युवकांना सबसिडी देण्याची योजना राबविण्यात आली होती. आतापर्यंत त्या योजनेचा ७२ हजार मराठ्यांनी लाभ घेतला असून ५७०० कोटींचे कर्जचवाटप झाले आहे. राज्य सरकारने महामंडळाच्या माध्यमातून ६०० कोटींचा व्याज परतावा दिला आहे. भविष्यात मराठा समाजाचे १ लाख उद्योजक घडविण्याचा मानस आहे, अशी घोषणा अण्णसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली. अण्णसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला यंदा पंचेवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महामंडळाच्या विशेष लोगोचे अनावरण मंगळवारी झाले. त्यानंतर नरेंद्र पाटील यांनी प्रसामारध्यमांशी संवाद साधत महामंडळाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली
एक लाख मराठा उद्योजक घडविणार, अण्णसाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची घोषणा
By मंगेश व्यवहारे | Published: December 12, 2023 12:51 PM