लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनीषनगर आणि लगतच्या वस्त्यांमधून वर्धा रोडवर येण्यासाठी लोकांना रेल्वे रुळ ओलांडावा लागत होता. फाटक बंद झाल्यानंतर लोकांना थांबावे लागायचे. या ठिकाणी उड्डाणपूल असावा, अशी या परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आता पूर्ण होणार आहे. आता मनीषनगर येथून थेट वर्धा रोड उड्डाणपुलावर आणि आरयूबी (रुळाखालून मार्ग) येथून वर्धा रोडवर जाता येणार आहे. त्यामुळे लोकांना रेल्वेचे फाटक बंद-सुरू होण्याची वाट पाहावी लागणार नाही.दोन्ही पुलाच्या पाहणी दौऱ्यानंतर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी पत्रकारांना सांगितले की, या मार्गावर दररोज एक लाख वाहनांची ये-जा असते. दाट वस्त्यांच्या भागात उड्डाणपूल आणि आरयूबीचे बांधकाम अत्यंत कठीण काम होते. त्याकरिता अनेकदा डिझाईनमध्ये बदल करण्यात आला. त्यामुळे पूल बांधताना तोडण्यात येणारी १४ घरे वाचली. पुलाचे बांधकाम करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आहे. पण बांधकामाचे काम महामेट्रोकडे सोपविले. हे काम वेळेत पूर्ण होणार आहे. चार महिन्यात आरयूबी आणि सहा महिन्यात उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. वाहन उड्डाणपुलावरून आणताना वर्धा मार्गावरील उड्डाणपुलावर डावीकडे वळवावे लागेल तर आरयूबी येथून आणताना वर्धा मार्गावर थेट नेता येणार आहे. त्यामुळे लोकांची वेळेची बचत होणार आहे.उड्डाणपूल रिलायन्स फ्रेशपासून वर्धा मार्गापर्यंत ९०० मीटर लांब तर दोन पदरी आरयूबी ५०० मीटर लांब आहे. पूर्वीच्या डिझाईननुसार जमिनीचे अधिग्रहण आणि घरांचा मोबदला देण्यासाठी २२० कोटींचा खर्च होता. १४ घरांचे मालक येथून जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे डिझाईनमुळे बदल करण्यात आला. त्यामुळे जमिनीच्या अधिग्रहणावर होणारा खर्च वाचला. आरयूबीमध्ये पाणी जमा होणार नाही, यावर लक्ष देण्यात आले आहे. पाण्याच्या निकासीसाठी तीन चेंबर तयार करण्यात आले आहेत. तसेच वर्धा मार्गावरून डावीकडे आरयूबीमधून जाताना प्रारंभी खुला भाग पॉलिकॉर्बोनेट शीटने कव्हर करण्यात येणार आहे; शिवाय आरयूबीमध्ये नैसर्गिक सूर्यप्रकाशासाठी सन पाईप टाकण्यात येणार आहे. याकरिता सहा पिण्याच्या पाण्याच्या लाईन, मलवाहिन्या आणि संबंधित विभागाची परवानगी घेऊन विजेच्या लाईनही बदलविल्या आहेत. आता १५ मीटर काम राहिले आहे. याशिवाय ८.५ मीटर रुंदीच्या उड्डाणपुलावर २५ मीटरचे २५ स्पॅन टाकण्यात आल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले.
उड्डाणपूल आणि आरयूबीमुळे एक लाख लोकांना सुविधा : बृजेश दीक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:55 AM
मनीषनगर आणि लगतच्या वस्त्यांमधून वर्धा रोडवर येण्यासाठी लोकांना रेल्वे रुळ ओलांडावा लागत होता. फाटक बंद झाल्यानंतर लोकांना थांबावे लागायचे. या ठिकाणी उड्डाणपूल असावा, अशी या परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आता पूर्ण होणार आहे. आता मनीषनगर येथून थेट वर्धा रोड उड्डाणपुलावर आणि आरयूबी (रुळाखालून मार्ग) येथून वर्धा रोडवर जाता येणार आहे. त्यामुळे लोकांना रेल्वेचे फाटक बंद-सुरू होण्याची वाट पाहावी लागणार नाही.
ठळक मुद्देमनीषनगर उड्डाणपूल सहा महिन्यात सुरू होणार