लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका व आरोग्य कर्मचाऱ्यासोबत कोरोना योद्धा म्हणून आशा वर्कर काम करीत आहेत. सध्या त्यांना दीड हजार रुपये मानधन मिळते. त्यांच्या कामाची दखल घेत मानधनाव्यतिरिक्त महिन्याला एक हजार रुपये अतिरिक्त देण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्यामुळे आशा वर्करला २ हजार ५०० रुपये मानधन मिळणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.मनपा सेवेत १५०० आशा वर्कर आहेत. एप्रिल महिन्यापासून कन्टेनमेंट झोन भागात सर्वे, पॉझिटिव्ह रुग्णांना गोळ्या वाटपाचे काम करीत आहेत. याची दखल घेत त्यांना एक हजार जादाचे देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा महिन्याला सुमारे १५ लाखांचा बोजा मनपावर पडणार असल्याची माहिती आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.हॉस्पिटलपुढे डॅश बोर्ड लावणारकोरोना रुग्णांना वेळीच उपचार मिळावे. यासाठी कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती बेड शिल्लक आहेत. याची माहिती उपलब्ध होण्यासाठी डॅश बोर्ड लावण्याचे निर्देश दिले आहेत. मनपा रुग्णालयात ४०० बेड तयार करण्यात आले. परंतु मनुष्यबळ नसल्याने अडचणी येत आहेत. लवकरच हा प्रश्न निकाली निघेल. असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. काही लोक भीतीपोटी खासगी रुग्णालयात बेड अडवून आहेत. त्रास नसेल तर भरती होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.खासगी हॉस्पिटलने वाजवी शुल्क घ्यावेकोरोना रुग्णांची उपचारासाठी भटकंती होऊ नये यासाठी खासगी कोविड-१९ रुग्णालयांची संख्या वाढविण्यात आली आहे. यामुळे १ हजार बेड उपलब्ध होतील. खासगी हॉस्पिटलने वाजवी शुल्क आकारावे. जादाचे शुल्क आकारल्यासंदर्भात तक्रार आल्यास त्याची दखल घेऊन संबंधितावर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.चाचण्या वाढल्याने रुग्ण वाढलेकोविड-१९ मुळे २४ तासात मृत्यू होणाऱ्याचे प्रमाण २५ टक्के आहे. रुग्णांवर वेळीच उपचार व्हावे. यासाठी चाचण्याची संख्या वाढविण्यात आली आहे. आधी दररोज ३५०० ते ३८०० चाचण्या होत होत्या. आता हा आकडा ६१३८ पर्यंत पोहचला आहे. चाचण्या वाढल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु वेळीच उपचार होण्याला यामुळे मदत होत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसताच चाचणीसाठी पुढे यावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले.
आशा वर्करला मानधनाव्यतिरिक्त एक हजार : मनपा आयुक्तांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 8:28 PM
महापालिका व आरोग्य कर्मचाऱ्यासोबत कोरोना योद्धा म्हणून आशा वर्कर काम करीत आहेत. सध्या त्यांना दीड हजार रुपये मानधन मिळते. त्यांच्या कामाची दखल घेत मानधनाव्यतिरिक्त महिन्याला एक हजार रुपये अतिरिक्त देण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.
ठळक मुद्दे महिन्याला १५ लाखांचा बोजा वाढणार