शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांचा खर्च वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 12:05 PM

Nagpur News विद्यार्थी घरातच बसून शिक्षण घेत असला तरी पालकांचा शैक्षणिक खर्च कमी न होता पुन्हा वाढला आहे.

ठळक मुद्देशाळेच्या फीबरोबरच मोबाईल, टॅब, इंटरनेटचाही खर्च शैक्षणिक प्रगती मात्र शून्य

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनामुळे यंदाही आभासी शिक्षणच विद्यार्थ्यांना द्यावे, असे शिक्षण विभागाचे निर्देश आहेत. विद्यार्थी घरातच बसून शिक्षण घेत असला तरी पालकांचा शैक्षणिक खर्च कमी न होता पुन्हा वाढला आहे. कारण शाळेत शैक्षणिक शुल्क भरायचेच आहे आणि संसाधनावरही खर्च करायचा आहे. एक वाहतुकीचा खर्च सोडल्यास बाकी शैक्षणिक खर्च आहे तोच आहे आणि त्यातही वाढ झाली आहे. गेल्या सत्रात शिक्षण ऑनलाईन झाले. पण त्याचे फलित काही निघाले नाही. तज्ज्ञांच्या मते, ऑनलाईन शिक्षणात शैक्षणिक प्रगती शून्यच आहे.

नियमित शाळा असताना पालकांना शिक्षणासाठी शाळेच्या फीबरोबरच शालेय गणवेश, वह्या पुस्तकांचा व शालेय साहित्यांवर खर्च करावा लागत होता. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी हा खर्च पालकांना करावाच लागत आहे. उलट पालकांचा अतिरिक्त खर्च वाढला आहे. मोबाईल, टॅब, इंटरनेट या संसाधनावर पालकांचा खर्च होत आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे पालकांचे आर्थिक नियोजन कोसळले आहे. अशात मोबाईल, टॅब, कॉम्प्युटर यावरचा खर्च मोठा आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत पालकांच्या पाल्याची चांगलीच गोची होत आहे.

- इंटरनेटचा खर्च किमान ३०० रुपये

मोबाईल, टॅब असेल तरी इंटरनेट नसेल तर ऑनलाईन शिक्षण शक्य नाही. इंटरनेटवर किमान महिन्याला ३०० रुपये पालकांना खर्च करावे लागत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या पालकांनी घरीच वायफायसुद्धा लावून घेतला आहे. त्याचा खर्च त्यापेक्षा जास्त आहे.

- ऑनलाईन शिक्षण असले तरी गणवेश आवश्यक

शहरातील काही शाळांनी विद्यार्थी घरून ऑनलाईन शिक्षण घेत असेल तरी शिस्त राहावी म्हणून गणवेश आवश्यक केला आहे. गणवेश घालूनच शिक्षण घ्यावे, अशीही सक्ती काही शाळांनी केली आहे. नामांकित शाळांमध्ये पुस्तके आणि शालेय साहित्य त्यांच्याकडूनच खरेदी करायचे आहे. अनुदानित शाळेत मुलांना पुस्तके नि:शुल्क मिळतात.

- ऑनलाईन शिक्षण खरेतर पालकांना परवडणारेच नाही. माझ्या घरी दोन मुले आहेत. एक सातवीत आणि एक नववीत आहे. दोघांचीही शाळेची फी भरायची आहे. पुस्तके वह्या घ्यायच्याच आहेत. दोघांसाठी दोन मोबाईल आहे. त्यांचा इंटरनेटवरचा महिन्याचा खर्च आहेच. शिक्षण ऑनलाईन असले तरी शाळा पूर्ण फी घेत आहे. फी नाही भरली तर विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद केले जाते.

वैशाली पवार, पालक

- कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण एकमेव पर्याय आहे. पण प्रत्यक्ष शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणात बरीच तफावत आहे. ऑनलाईनमुळे मुले एकलकोंडी होत आहेत. मुलांना मानसिक विकासासाठी मोकळे वातावरण असणे अपेक्षित आहे. मोबाईलवर अभ्यास असल्याने मुलांचे मन विचलित होऊ शकते. ऑनलाईन शिक्षणात शिस्तीची कमतरता निर्माण होते.

डॉ. मनीष ठाकरे, मानसोपचार तज्ज्ञ

 

टॅग्स :onlineऑनलाइनEducation Sectorशिक्षण क्षेत्र